“विविध शब्दकोशातले ‘किटाई’चे संदर्भ पाहिले की ‘किट – किटण – किटणे’ हे शब्द मूळ कोणत्या भाषेतले, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. हा शब्द आर्यभारतीय - संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती - भाषेत दिसतो; तसा तमिळ, कानडी या द्राविडी भाषेतही दिसतो. ‘किटणे’ या शब्दाचे मळणे, गंजणे हे अर्थ पाहिले तर एक गोष्ट सहज लक्षात येते, ती म्हणजे एखादी गोष्ट किटते, मळते तेव्हा ती काळीच पडत असते. तेव्हा काळेपणाचे अधिक्य या अर्थाने अभंगातला ‘किठाई’ शब्द विठोबाच्या कृष्ण वर्णाला उद्देशून आहे, हे सहज लक्षात येतं.” – ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ सदरातील साधना गोरे यांचा लेख
...
आपल्याच भाषेतला असा एखादा शब्द अवचित समोर येतो, की आजवर माहीत असलेल्या शब्दांच्या संदर्भात त्याचा अर्थ लागेनासा होतो. पण त्याच्या अर्थापर्यंत पोहोचण्याची मनाची असोशी तर स्वस्थ बसू देत नाही. ‘रंगा येई वो येई, रंगा येई वो येई। विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई।।’ हा ज्ञानेश्वरांचा अभंग वाचून काहीसं असंच झालं. या अभंगातला ‘किठाई’ शब्द विठोबाला उद्देशून आहे हे कळत होतं, पण त्याचा नेमका अर्थ गवसत नव्हता. अशा वेळी मदतीला धावून आले ते अर्थात शब्दमित्र, म्हणजे विविध कोश!
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शब्द व्युत्पत्ती
, शब्दव्यवहार
, साधना गोरे
, मराठी अभ्यास केंद्र
Yogesh Bhavsar
3 वर्षांपूर्वीलेख छान आहे आवडला
atmaram jagdale
3 वर्षांपूर्वीछान माहिती
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई . हा माउलींचा अभंग शेकडो वेळा ऐकला आहे.. पण किठाई शब्दाचा अर्थ आज कळला. आभार.
Shankar Deorao
3 वर्षांपूर्वीछान मांडणी.