“जगातले अविकसित देश बहुभाषिक आहेत किंवा बहुभाषिक लोक अविकसित आहेत, असं अभ्यासकांचं एक गृहीतक आहे. हे विधान भारतालाही लागू करता येतं. मात्र भाषा हा समाजाच्या विकासाचा अडसर ठरायला नको असेल, तर त्याचा कालानुमानाने आवश्यक तो पुनर्विचार केला पाहिजे. दुसरं म्हणजे, भाषेच्या विकासाची सर्व जबाबदारी शासकीय यंत्रणांवर सोपवता येणार नाही. अर्थात, आवश्यक ती शासकीय धोरणं, प्रशासकीय यंत्रणा आणि निधीचं पाठबळ या गोष्टी हव्यातच; पण त्यापलीकडे जाऊन शिक्षणतज्ज्ञ, लेखक, पत्रकार, वक्ते आणि एकूणच सर्वसाधारण माणूस यांनी त्याचा विचार प्राधान्याने आणि सातत्याने केला पाहिजे.” – भाषाभ्यासक अशोक केळकर यांच्या कार्याचा आढावा मांडणारा मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा लेख -
...
महात्मा गांधीनी 'यंग इंडिया' १९२१च्या एका अंकात खूप लक्षणीय विधान केलं आहे. ते म्हणतात की, 'माझ्या घरात जगभरच्या संस्कृतींचा मुक्त वावर असावा असं मला वाटतं; पण त्या वावरामुळे आणि वादळांमुळे माझे पाय जमिनीवरून निसटणार नाहीत याची मी काळजी घेईन. माझ्या देशातल्या तरुण मुलामुलींना मी असं सुचवेन की, त्यांनी इंग्रजीसहित जगातल्या अनेक भाषा आवर्जून शिकाव्यात आणि मग आपल्या ज्ञानाचा फायदा भारतासहित जगाला मिळवून द्यावा. पण एकाही भारतीयाने आपल्या मातृभाषेला विसरू नये किंवा दुर्लक्षित करू नये किंवा त्याची लाज वाटून घेऊ नये. मातृभाषेतून आपला सर्वोच्च विचार मांडता येणार नाही, असं कुणालाही वाटता कामा नये.' दुसऱ्या एके ठिकाणी बोलताना गांधी असं म्हणतात की, 'माझ्या देशातली विचारी माणसं आपली सर्वश्रेष्ठ प्रतिभा इंग्रजीतून व्यक्त होण्यासाठी राखीव ठेवतात हे देशाचं दुर्दैव आहे.' हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे ज्येष्ठ भाषातज्ज्ञ स्वर्गीय अशोक केळकर यांनी भाषाविषयक प्रश्नांचा आयुष्यभर घेतलेला धांडोळा.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Dilip Phaltankar
3 वर्षांपूर्वीखूपच अभ्यासपूर्ण लेख.