“पश्चिम महाराष्ट्रात आताआतापर्यंत आत्याच्या मुलीला संबोधण्यासाठी ‘व्हंजी’ संबोधन वापरलं जात असे. या अर्थातही वहिनीची अर्थच्छटा दिसते. वहिनीचं लघुरूप ‘व्हं’ करून त्याला पुढे आदरार्थी ‘जी’ प्रत्यय जोडला आहे. मोठ्या बहिणीच्या नवऱ्यासाठी, मोठ्या दिरासाठी वापरली जाणारी दाजी, भाऊजी/भावजी ही संबोधनंही भावासाठी वापरल्या जाणाऱ्या दादा, भाऊ या संबोधनातून तयार झालेली आहेत. आणि ‘व्हंजी’प्रमाणे या संबोधनांनाही ‘जी’ हा आदरार्थी प्रत्यय लावला जातो.” – शब्दांच्या पाऊलखुणा या सदरातील वहिनी शब्दाची व्युत्पत्ती सांगणारा साधना गोरे यांचा लेख
...
भारतातील मराठीसारख्या प्रादेशिक भाषांमधील नातेवाचक शब्द पाहिले की आपल्या भाषा सासंकृतिकदृष्ट्या किती समृद्ध आहेत याची साक्ष पटते. मोठ्या बहिणींना संबोधण्यासाठी पूर्वी जिजी, आक्का, ताई, माई, बाई, अशी अनेक संबोधनं वापरली जात. हा क्रम त्यांच्या मोठेपणाच्या श्रेणीवरूनही ठरत असे. म्हणजे भावंडांत सर्वांत मोठी ती जिजी, बहिणींमध्ये सर्वात मोठी ती आक्का अन् मग श्रेणीनुसार ताई, माई, बाई ही संबोधनं वापरली जात. हळूहळू या श्रेणींतला काटेकोरपणा गेला असावा. आता कुटुंबं आटोपशीर झालेली असल्याने हा क्रम पाळण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र आजही महाराष्ट्रातल्या अनेक भागांत गेल्या पिढ्यांमधील कुटुंबामध्ये मोठ्या बहिणींसाठी याच क्रमाने संबोधनं वापरण्याची पद्धत आहे. हीच गोष्ट पूर्वी दादा, नाना, आप्पा, भाऊ या संबोधनांचीही असावी.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शब्द व्युत्पत्ती
, शब्दव्यवहार
, साधना गोरे
, मराठी अभ्यास केंद्र
Vanashri Phalake
3 वर्षांपूर्वीछान
Abhay Dhopawkar
3 वर्षांपूर्वीखूपच छान
Geeta Manjrekar
3 वर्षांपूर्वीछानच !
atmaram jagdale
3 वर्षांपूर्वीछान