“समजण्याची क्रिया मातृभाषेच्या संदर्भात जशी सुलभतेने होते, तशी परक्या किंवा इतर भाषांच्या संदर्भात होऊ शकत नाही. कारण, ती भाषा ‘ऐकण्याच्या किंवा बोलण्याच्या’ भरपूर संधी उपलब्ध होऊ शकत नाहीत. घरीदारी, शाळेत, मैदानात, शैजारीपाजारी जसे मातृभाषेचे वातावरण असते तसे, त्या दुसऱ्या भाषेचे वातावरण नसते. म्हणून मुलांच्या शिक्षणाचे माध्यम ‘मातृभाषा’च असावे. इंग्रजी ही भाषा जर माध्यम म्हणून स्वीकारली, तर मुलांच्या आकलनशक्तीवर दुप्पट ताण पडतो.” – हेमा क्षीरसागर यांचा शिक्षणाशास्त्रातील मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करणारा लेख.
कोठेही जा मनुष्यजीवन भाषाव्यापृत दिसते।
कोठेही जा दिशादिशांतून भाषा कानी येते।।
ईश्वराचे सर्वव्यापित्त्व वर्णन करताना ‘स्थिरचर व्यापून दशांगुळे उरला’ म्हणतात. हेच वर्णन आज भाषेलाही तंतोतंत लागू पडते. मानवी जीवनाचे एकही क्षेत्र असे नाही, की जिथे भाषेचा प्रवेश नाही, वापर नाही, संचार नाही. मानवाच्या जीवनात क्षणोक्षणी व पावलोपावली भेटणाऱ्या व लागणाऱ्या वस्तूंना नावे असतात. धनधान्य, अन्नपदार्थ, घरदार, वस्त्रेप्रावरणे यांना नावे असतात. पर्यावरणातील झाडे, वेली, फुले, फळे, प्राणी-पक्षी, पाऊस-पाणी, वादळवारा यांसारख्या नैसर्गिक घटना यांनाही नावे असतात. हवा जशी डोळ्यांना दिसत नसूनही सर्वत्र भरून राहिली आहे, तशीच भाषाही डोळ्यांना दिसत नसूनही सर्वत्र भरून राहिली आहे. इतिहास, भूगोल, विज्ञान, संगीत, चित्रकला, नृत्यकला, गणित, तत्त्वज्ञान; एवढेच नाही, तर ईश्वर चिंतनात सुद्धा भाषा भरून राहिली आहे. जशी जागेपणी तशी स्वप्नातही, जशी कल्पनेत तशी विचारातही, जशी दुसऱ्याशी संवाद साधायला तशीच स्वतःशी मनातल्या मनात बोलायला सुद्धा आपण भाषा वापरतो. भाषाविरहित मानवी जीवन ही कल्पनाही अशक्य आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी भाषा
, मातृभाषेतील शिक्षण
, डॉ. हेमा क्षीरसागर
, मराठी अभ्यास केंद्र