“लोहियांच्या म्हणण्यात ताकद आहे. त्यांचं बिगर काँग्रेसवादाचं धोरण जितकं महत्त्वाचं होतं, तितकंच ‘इंग्रजी हटाओ’चं आहे. इंग्रजी जाणणाऱ्या मूठभर लोकांच्या जिवावर हा देश चालणार नाही आणि चालला तरी त्यातून निर्माण होणारी व्यवस्था न्याय्य असणार नाही, याची स्पष्ट जाणीव लोहियांना झालेली दिसते. मात्र त्यावेळी त्यांनी 'इंग्रजी हटाओ' अशी घोषणा न करता ‘देशी भाषा किंवा प्रादेशिक भाषा बचाओ’ अशी केली असती, तर त्याला यश मिळण्याची अधिक शक्यता होती. लोक इंग्रजीच्या वसाहतवादी वर्चस्वा- राममनोहर लोहिया बद्दल जितके साशंक आहेत, तितकेच हिंदीच्या देशांतर्गत वसाहतवादाबद्दलही साशंक आहेत.” राममनोहर लोहिया यांची भाषिक भूमिका मांडणारा मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा लेख -
...
राममनोहर लोहिया हे समाजवादी चळवळीतले अग्रगण्य नेते. भारतातली समाजवादी चळवळ विखंडित, शतखंडित झाली आहे हे लक्षात घेता, अशा चळवळीतल्या नेत्याचं देशातल्या राजकारणातलं स्थान नीट अधोरेखित न होणं हे स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. या लेखात लोहियांच्या भाषाविषयक भूमिकेचा व त्याचा भारतीय राजकारणावर झालेल्या परिणामांचा विचार करू. जात आणि भाषा ही शोषणाची दोन हत्यारं आहेत. शोषकांच्या हातातून ती हिसकावून घेतल्याशिवाय आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकणार नाही, असं लोहियांच मत होतं. म्हणून मूठभर उच्चवर्णीय आणि इंग्रजीशिक्षित यांचा सत्तेवरील एकाधिकार संपुष्टात आणण्याची हाक लोहियांनी दिली.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
भाषाविचार
, राममनोहर लोहीया
, दीपक पवार
, मराठी अभ्यास केंद्र
व्यक्ती विशेष