भाषानियोजन आणि मराठी भाषा


बंद पडणाऱ्या मराठी शाळा हा मराठी भाषेच्या सार्वत्रिक व शासकीय अवहेलनेचा ढळढळीत पुरावा आहे. असे का झालेउचित व न्याय्य भाषाधोरणकालबद्ध व उद्दिष्टलक्ष्यी भाषानियोजनभाषाविकासाची उत्तरदायी व सक्षम यंत्रणा यांच्या अभावाची ही अपरिहार्य परिणती आहे. अशा निर्नायकीनिरंकुश परिस्थितीत मराठी भाषा अद्याप टिकून आहे, याचेच नवल वाटते. आज मराठी भाषेला भीती आहे; ती इंग्रजीची नव्हे, तर भाषाविकासाची सक्षम यंत्रणा प्रस्थापित न करणाऱ्या व त्याबाबतचे उत्तरदायित्व नाकारणाऱ्या महाराष्ट्र सरकारची.” - ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा भिजत धोरण पडलेल्या मराठीविषयीचा लेख
‘नियोजन’ ही व्यवस्थापनशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. मात्र हे शास्त्र स्वतंत्र अभ्यासशाखा म्हणून अस्तित्वात येण्याआधीपासून लोक व्यवस्थापन करीत होते आणि नियोजनही करीत होते. कोणतीही व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी ती समस्या आधी नीट समजून घेणे, काही तरी चमत्कार घडून ती समस्या आपोआप सुटेल म्हणून वाट पाहत न बसता, ती जाणीवपूर्वक सोडवण्यासाठी उद्दिष्टलक्ष्यी व योजनाबद्ध सर्व तयारीनिशी कृती करणे; ह्या मार्गाचा अवलंब फार पूर्वीपासून मनुष्य करीत आला असला, तरी त्याची सैद्धान्तिक मांडणी करून समाजाच्या सर्व व्यवहारक्षेत्रांत ह्या मार्गाचे प्रभावी उपयोजन कसे करता येईल, याचे मार्गदर्शनपर साहित्य मात्र आधुनिक काळात लिहिले गेले. समस्येच्या भूतवर्तमान स्थितीचा वस्तुनिष्ठ विचार करून ती सोडवण्याची संभाव्य कृती किंवा तिची रूपरेषा ठरवणे म्हणजे नियोजन होय. शहाणी माणसे आपल्या दैनंदिन व्यवहारांत तर हे करीतच असतात. त्यांच्या व्यावहारिक यशाचे ते एक महत्त्वाचे कारण असते. आर्थिक क्षेत्रात तर नियोजनाशिवाय पानही हलत नाही. अन्य व्यवहारक्षेत्रांतही विकासप्रक्रियेचा व समस्यानिर्मूलनाचा खात्रीचा मार्ग म्हणून नियोजनाचा मोठ्या प्रमाणात अवलंब केला जातो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी भाषा , भाषानियोजन , डॉ. प्रकाश परब , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen