शब्दांच्या पाऊलखुणा - आलं आलं रुखवत (भाग ४०)


“‘रुखवत’ शब्द फारसीतून आला असला तरी त्या संस्कृतीत तो आपण वापरतो त्या अर्थाने वापरला जात नाही. त्यामुळे तो फारसीतील मूळ कोणत्या शब्दापासून आला असावा याबद्दल शब्दकोशकारांमध्ये मतभिन्नता दिसते. कृ. पां. कुलकर्णी या शब्दाचं मूळ फारसीतील देणगी या अर्थाच्या ‘रुषमत्’ शब्दात असल्याचं म्हणतात, तर ‘महाराष्ट्र शब्दकोशा’त देणगी अर्थाच्या ‘रुश्वत’ आणि लाच अर्थाच्या ‘रिश्वत’ शब्दात रुखवतचं मूळ असल्याचं म्हटलं आहे.” - शब्दांच्या पाऊलखुणा या सदरातील 'रुखवत' शब्दाची व्युत्पत्ती सांगणारा साधना गोरे यांचा लेख
महाराष्ट्रीय लग्नाचं एक आगळं वैशिष्ट्य म्हणजे लग्नात मुलीला दिला जाणारा रुखवत. या रुखवतात विविध खाद्यपदार्थापासून ते शोभेच्या, गृहोपयोगी विविध वस्तू असतात. प्रत्यक्ष लग्नाइतकाच तर कधी त्याहून अधिक लक्षात राहतो तो मांडवातला रुखवत. रुखवतातील वस्तूंचं आगळेपण हे तर त्याचं एक कारण असतंच, पण त्यांची मांडणीही चित्तवेधक खुबीने केलेली असते. जगण्याच्या आधुनिक साधनांबरोबर आपल्या परंपरा बदलल्या, तशी रुखवतातही कालांतराने नवनव्या वस्तूंची भर पडत गेलेली दिसते. आता आपल्याला हा रुखवत अस्सल मराठी वाटत असला तरी त्याचं मूळ मात्र फारसी – अरबी शब्दांत असल्याचं दिसतं.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शब्द व्युत्पत्ती , शब्दव्यवहार , साधना गोरे , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Geeta Manjrekar

      2 वर्षांपूर्वी

    छान माहिती .. संदर्भ , संशोधन उत्तम.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen