भाषा आणि बोली : परस्परसंबंध


“प्रमाणभाषा ब्राह्मणांची बोली आहे, ही समजूत चुकीची आहे. या संदर्भात प्रसिद्ध विदुषी डॉ. मॅक्सीन बर्नसन यांनी केलेल्या पाहणीचा निष्कर्ष महत्त्वाचा ठरेल. त्यांनी फलटणच्या परिसरातील बोलींचा अभ्यास केला आहे. त्यांच्या पाहणीचा निष्कर्ष असा की, त्या परिसरातील ब्राह्मण इतर समाजातील लोकांपेक्षा अधिक अशुद्ध बोलतात, हा निष्कर्ष अगदी बोलका आहे. प्रमाणभाषेचा संपर्क विशिष्ट जातींपेक्षा सुशिक्षित समाजाशी अधिक असतो. सर्वच जातींमधील लोक आता सुशिक्षित होत आहेत आणि त्यांची भाषाही आता प्रमाणभाषाच झाली आहे. प्रमाणभाषेवरील ब्राह्मणांची मक्तेदारी आता संपत चालली आहे. – प्रमाणभाषा आणि बोली यांच्या परस्परसंबंधाविषयीचा डॉ. कल्याण काळे यांचा लेख
भाषा आणि बोली ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ सारखेच आहेत. भाषा म्हणजे जी बोलली जाते ती आणि बोली म्हणजेही जी बोलली जाते तीच. पण भाषेचे क्षेत्र खूप व्यापक असते. बोलीचे क्षेत्र भाषेने व्यापलेल्या क्षेत्राच्या पोटविभागात असते, म्हणजे भाषेच्या क्षेत्राच्या मानाने बरेच लहान असते. भाषेचे जे पोटविभाग असतात त्यांना बोलींची क्षेत्रे म्हणता येईल. बोली ही प्रत्यक्षात बोलली जाते. भाषेच्या क्षेत्रात अनेक बोलींची क्षेत्रे समाविष्ट असतात. त्या अनेक बोलींना सामावून घेणारी संस्था म्हणजे भाषा. भाषा हे बोलींच्या संघटित समूहाचे नाव आहे. त्यामुळे भाषा प्रत्यक्षात बोलली जात नाही, ती कुठल्या तरी बोलीच्या रूपानेच बोलली जाते. बोली प्रत्यक्षात बोलली जाते, म्हणून ती मूर्त स्वरूपात असते. भाषा ही अनेक बोलींच्या समूहाचे नाव असल्याने ती मूर्त स्वरूपात आढळत नाही. तिचा मूर्त आविष्कार कुठल्या तरी बोलीच्या रूपातच होतो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रमाण भाषा , बोली भाषा , मराठीच्या बोलीभाषा , डॉ.कल्याण काळे , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen