भाषाविचार - यशवंतराव चव्हाण (भाग – ३२)


लोक मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवत आहेत याचं महत्त्वाचं कारण प्रादेशिक भाषांमध्ये उच्च शिक्षण उपलब्ध नाही. प्रादेशिक भाषांमधलं शिक्षण प्रामुख्याने नोकरीशी आणि पर्यायानं पोटाशी जोडलं गेलं पाहिजे. लोकभाषा ही ज्ञानभाषा होणं आणि ती पोटाची भाषा होणं या दोन्ही गोष्टी एकमेकांशी अभिन्नपणे जोडल्या गेल्या आहेत. जोपर्यंत त्याची सांगड घालणारं भाषानियोजन होत नाही आणि अमलात येत नाहीतोपर्यंत प्रश्न सुटणार नाही.” – मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या भाषाविषयक कार्याचा आढावा घेणारा लेख -
हाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे भाषा-संस्कृतीच्या प्रश्नांवर व्यापक जनसंवाद करण्याबद्दल प्रसिद्ध होते. महाराष्ट्रातल्या भाषानियोजनविषयक यंत्रणांचा त्यांनी पाया घातला. ७ सप्टेंबर १९६७ रोजी कोपरगावला एका महाविद्यालयाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी त्यांनी जे भाषण केले, ते भाषेच्या प्रश्नावर काम करणारे सर्व कार्यकर्ते आणि प्रशासक यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ‘लोकभाषा हीच ज्ञानभाषा’ या शीर्षकाचे त्यांचे हे भाषण ‘युगांतर’ या त्यांच्या निवडक भाषणांच्या संग्रहात प्रसिद्ध झाले आहे. चव्हाण असं म्हणतात की, 'उच्च शिक्षण मातृभाषेत असावे की नसावे, याबद्दल वाद सुरू झाला आहे. शिक्षण समाजाच्या खालच्या थरापर्यंत पोहोचायला हवं असेल, तर ते मातृभाषेतच झालं पाहिजे.' आपला मुद्दा स्पष्ट करताना ते १५० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतल्या इंग्रजी शिक्षणाच्या फसलेल्या प्रयोगाची माहिती देतात. 'सामान्य माणसाची सगळी ताकद जर परकीय भाषा शिकण्यात निघून गेली, तर तो ज्ञानसंपादन कधी करणार?' असा मूलभूत प्रश्न चव्हाण मांडतात. भारतीय समाजात क्रांती होऊन दूरगामी बदल झाले आहेत असं दिसत नाही. त्यामुळे ज्यांचं वर्चस्व, त्यांची भाषा लोकांना स्वीकारावी लागली, असं दिसतं. इतिहासात सततच सत्ताधाऱ्यांची भाषा वेगळी आणि लोकांची भाषा वेगळी असं घडत आलं. लोकशाहीमुळे पहिल्यांदा लोक आणि राज्यकर्ते यांचा सांधा जुळतो आहे. अशा परिस्थितीत जी भाषा लोकांची तीच भाषा कोर्टांपासून सगळीकडे वापरली गेली पाहिजे, असा त्यांचा युक्तिवाद आहे.

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषाविचार , यशवंतराव चव्हाण , डॉ. दीपक पवार , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen