आपल्या संस्कृतीत स्त्रीची, मातृशक्तीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. महाराष्ट्रात विविध सण-उत्सवानिमित्ताने देवी, नदी, स्त्री यांच्या ओटीभरणाचा विधी केला जातो. ओटीभरणाचा विधी हा प्रतीकात्मकरीत्या स्त्रीच्या सर्जनशक्तीचे पूजन आहे, आदरभाव आहे. - शब्दांच्या पाऊलखुणा या सदरातील 'ओटी' शब्दाची व्युत्पत्ती सांगणारा साधना गोरे यांचा लेख
...
‘ओटी’ म्हणजे नाभीखालचे पोट, स्त्रीचे गर्भाशय असते तो शरीराचा भाग. याला ‘ओटीपोट’ असंही म्हणतात. कानडी ‘उडी’ या शब्दापासून ‘ओटी’ शब्द आल्याचे कृ. पां. कुलकर्णींनी म्हटले आहे. कानडीत ‘उडी’ म्हणजे कंबर, पोट. याचा अर्थ ‘ओटीपोट’ हा शब्द दोन भाषांतील एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला आहे. स्त्रीची ओटी भरताना तिच्या पोटाजवळील लुगड्याच्या-साडीच्या पदराच्या भागात तांदूळ, खोबरे, नारळ, लेकुरवाळे हळकुंड, खण वगैरे पदार्थ भरले जातात. या वस्तू नवनिर्मितीच्या, सौभाग्याच्या सूचक मानल्या गेलेल्या आहेत. हळूहळू यावरूनच काही स्वीकार करण्याकरिता पसरलेले वस्त्र, वस्त्राचा भाग याला ओटी – ओटा म्हटलं जाऊ लागलं असावं. मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते, त्याप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे, वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा, तिच्या सर्जनशीलतेचा गौरव आहे. मात्र हा गौरव करताना आपल्या संस्कृतीने त्याचा इतका अतिरेक केला आहे की, त्यामुळे प्रत्यक्ष स्त्रीचे माणूसपण मागे पडून तिची ही सर्जनशीलताच समाजाला महत्त्वाची वाटू लागलीय. त्यातही आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीने सुवासिनी स्त्रियांच्या सर्जनशीलतेलाच नैतिक मानल्याने सर्वसाधारणपणे सुवासिनी स्त्रियांचीच ओटी भरण्याची परंपरा आहे. स्त्रीला मूलबाळ असणे या अर्थाने ‘कुस उजवणे’ हा शब्दप्रयोग वापरला जातो, त्याप्रमाणे ‘ओटीपोट पिकणे’ असंही म्हटलं जातं.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शब्द व्युत्पत्ती
, शब्दव्यवहार
, साधना गोरे
, मराठी अभ्यास केंद्र
Yogesh Bhavsar
3 वर्षांपूर्वीलेख आवडला छान आहे
Geeta Manjrekar
3 वर्षांपूर्वीछानच माहिती आणि संदर्भ आले आहेत या लेखात.सर्वांगाने विचार झाला आहे ओटी शब्दाचा.