“पेशवाईच्या पडत्या काळात जन्माला आलेले माधवराव यांच्या हातूनही त्यांचे कर्तबगार चुलते थोरले माधवराव पेशवे यांच्यापेक्षा उत्कृष्ट कामगिरी पार पडेल, या अपेक्षेने त्यांना ‘सवाई माधवराव’ असं नाव देण्यात आलं. दुसरं म्हणजे, जन्मानंतर अवघ्या सवा महिन्यात म्हणजे चाळीस दिवसांनी माधवरावांना सातारच्या गादीकडून पेशवाईची वस्त्रं मिळाली, त्यांच्या ‘सवाई’ विशेषनामागील या ऐतिहासिक परिस्थितीचा संदर्भही लक्षात घ्यायला हवा.” – ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ या सदरातील साधना गोरे यांचा ‘सवा’ शब्दाचा धांडोळा घेणारा लेख -
...
वरील बातमीसदृश शीर्षकातील ‘सव्वा लक्ष’ हे शब्द वाचून पानिपतच्या युद्धात सव्वा लक्ष बांगडी फुटल्याचा संदर्भ आठवायला मराठी मनाला फार सायास करावे लागत नाहीत, इतके हे शब्द महाराष्ट्रीयांच्या नेणिवेत आहेत. गणिताच्या भाषेत सवा किंवा सव्वा हा केवळ एक अपूर्णांक आहे; पण या शब्दाशी संबंधित विविधांगी संदर्भ तपासले की, हा अपूर्णांक मराठी मनाशी केवढा सांस्कृताळलेला आहे याची कल्पना येते.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शब्द व्युत्पत्ती
, शब्दव्यवहार
, साधना गोरे
, मराठी अभ्यास केंद्र
Ashwini Sathe-Ghangrekar
3 वर्षांपूर्वीसुंदर माहिती. सवा चा असा कधी विचार केला नाही,