“विशेष गोष्ट म्हणजे गोळवलकर गुरुजी संस्कृतच्या खालोखाल हिंदीचा विचार करतात. पण मराठी भाषक असून अपवादानेही त्यांच्या बोलण्यात मराठी भाषेचा उल्लेख येत नाही. संघाचे दोन सरसंघचालक वगळता सर्व मराठी आहेत. पण त्यांना आपल्या भाषेबद्दल काहीच वाटत नसेल का? की सगळ्या भाषांच्या विकासात आपल्या भाषेचा विकास सामावला आहे असं त्यांना वाटत असावं? की एक देश, एक धर्म, एक भाषा, एक संस्कृती या एकारलेपणात आपल्या मातृभाषेवरचं प्रेम मरून जात असावं? वेगळ्या अर्थाने तसंच गांधीवाद्यांचंही होत असावं का? गांधी आणि हिंदुत्ववादाच्या भक्तांना आवडत नसलं तरी हे या दोन विचारधारांमधलं अदुर्लक्षणीय साम्य म्हणता येईल का?” – मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा गोळवलकर गुरुजींच्या भाषाविषयक विचारांचा आढावा घेणारा लेख -
...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या लेखनाच्या आधारे संघाची भाषाविषयक भूमिका मी या लेखात मांडणार आहे. वस्तुत: मी संघाच्या विचारधारेचा कडवा विरोधक आहे. त्यामुळे संघसमर्थकांना त्यात 'स्यूडो सेक्युलर' माणसाने खुस्पटं काढल्याचा वास येऊ शकेल. असो, तर डाव्या, पुरोगामी, समाजवादी वगैरे मंडळींनी अशा अस्पर्श विषयावर लिहायचं धाडस केल्यामुळे आणखी एकाला जातिबहिष्कृत करण्याची संधी मिळेल. हे चष्मे थोडा काळ काढून ठेवले आणि एका निखळ प्रादेशिक भाषावाद्याला संघाच्या भाषाविचाराबद्दल काय वाटतं, या दृष्टीने पाहिलं तर चर्चा पुढे सरकण्याची शक्यता आहे.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी भाषा
, डॉ. दीपक पवार
, मराठी अभ्यास केंद्र
, गोळवलकर गुरुजी
Sanjay Ratnaparkhi
3 वर्षांपूर्वीउत्तम लेख आणि विश्लेषण वाचायला मिळाले. आजही शिक्षण धोरण आहे.परंतु भाषा शिक्षण धोरण नाही. ते असायला हवे आहे, ही जाणीव कोठेच दिसत नाही. डॉ. पवार यांचे अभिनंदन.