साहित्यभाषा : बदलती न बदलती


एखाद्या काव्यामध्ये प्रतीयमान अर्थच नसेल तर आनंदवर्धनाचार्य त्या काव्यास अधमकाव्य म्हणतात. त्यांचे ते मत ऐकून विरोधक म्हणाले की, ध्वन्यार्थ नसलेले काव्य काव्यच नाही, असे तुम्ही म्हणता; मग त्याला अधमकाव्य तरी का म्हणता?’ यावर आचार्यांनी उत्तर दिले, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्या काव्याकडे पाहून त्याला अधमकाव्य न म्हणता ते काव्यच नाही असेच म्हणावयास हवे. तुमचे म्हणणे बरोबर आहे; पण तरीही मी त्याला अधमकाव्य का म्हणतो, तर कवीचा हेतू लक्षात घेऊन त्या कवीला काव्यच निर्माण करावयाचे होते, पण ते त्याला जमलेच नाही. म्हणून त्याच्या व्यंग्यार्थशून्य काव्याला मी अधमकाव्य असे नाव देतो.’ – साहित्यभाषेची अचूक लक्षणे सांगणारा द. भि. कुलकर्णी यांचा लेख
संगीत, चित्र, शिल्प आणि नृत्य या चार ललितकलांनंतर साहित्य या कलेचा निर्देश आपण नेहमी करीत असतो. त्यामुळे साहित्यकला ही गुणानुक्रमाने खालची कला आहे, अशी भावना समाजात निर्माण होते. तिला मर्ढेकरी सौंदर्यशास्त्राने हातभारच लावला आहे. मर्ढेकरांचे म्हणणे असे की, इंद्रियसंवेदनेवर आधारलेली ललितकला माध्यमदृष्ट्या श्रेष्ठ कला असते. संगीत – चित्र – शिल्प – नृत्य या कला माध्यमदृष्ट्या इंद्रियसंवेदनांवर आधारलेल्या असल्यामुळे त्या माध्यमदृष्ट्या वाङ्‍मयकलेच्या तुलनेत श्रेष्ठ कला आहेत. त्यातही संगीतकला ही एकाच इंद्रिय संवेदनेवर – श्रुतीसंवेदनेवर आधारित असल्यामुळे ती माध्यमदृष्ट्या इतर सर्व कलांपेक्षा श्रेष्ठ कला होय. साहित्यकला कुठल्याच इंद्रियसंवेदनेवर, माध्यमदृष्ट्या आधारित नसल्यामुळे ती माध्यमदृष्ट्या भ्रष्ट आणि दुय्यम कला आहे.
कवी असलेल्या सौंदर्यशास्त्त्रज्ञाचे हे उद्गार साहित्यिक आणि साहित्यरसिक यांना क्लेशकारक वाटणे स्वाभाविक आहे. असो, सौंदर्यशास्त्राच्या प्रशिक्षित अभ्यासकांना तरी असे वाटावयास नको; पण त्यांना तसे वाटते. त्यांच्या वैचारिक प्रतिक्रियेत भावनिक प्रतिक्रिया मिसळते; आणि मग साहित्यकला कशी जीवननिष्ठ कला आहे वगैरे मुद्दे मांडून ते मर्ढेकरांच्या विचारांचा  विपर्यास करतात.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


साहित्यभाषा , द. भि. कुलकर्णी , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen