“बैलगाडी हाकायची सवय असलेले आजोबा स्कूटर सुरू करताना आणि थांबवताना हॅन्डलला धरून सवयीने ‘हैक हैक’ असंच म्हणायचे, जणू काही गायी-म्हशीच हाकारतायत. हळूहळू हे आजोबा कुठेही दिसले की लोक त्यांना ‘हैक हैक’च संबोधू लागले होते. जनावरांसाठी वापरलं जाणारं हाकारणे/हाकरणे हे क्रियापद पुढे गलबत, नाव चालवणं यासाठीही कसं रूढ झालं असावं, याची जिवंत प्रक्रियाच या घटनेतून समोर येते.” हाक-हाकारणे यांची व्युत्पत्ती सांगणारा साधना गोरे यांचा लेख -
...
एखादा रोजच्या वापरातला शब्द वाच्यार्थाने न वापरता विशेष अर्थानं, अन् तोही सटीसामाशी वापरला जाऊ लागला की त्याचं वाक्प्रचारात रूपांतर होतं. असा, आताशा केवळ वाक्प्रचार म्हणूनच मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा शब्द म्हणजे - हाक. जग बोटांच्या टिचकीत आलं खरं, अन् त्याचं अपार कौतुकही आहे; पण त्यामुळे की काय जवळच्यांनाही हल्ली हाळी किंवा हाक दिली जात नाही, तर बोलावलं जातं, आवाज दिला जातो. अन् जवळचे दूर असल्यावर कॉल केला जातो.
हाक म्हणजे पुकारा, आरोळी, एखाद्याच्या नावाचा मोठ्यानं उच्चार करून त्याला बोलावणं. मुंबईतल्या एखाद्या गर्दीच्या रेल्वे फलाटावर किंवा एखाद्या जिल्ह्यातल्या गजबजलेल्या एस. टी. स्टँडवर आपला मित्र दुरून दिसला तर आपण त्याला हाळी देत नाही, कारण तेवढ्या कोलाहलात त्याला ती ऐकायला जाणं शक्यच नाही. मात्र, मोबाइल सार्वत्रिक व्हायच्या आधी गावागावांतून, विशेषतः रानावनात एकमेकांना बोलावण्यासाठी दुरून एकमेकांना हाळ्या दिल्या जायच्या. अजूनही गावाकडे अंतर सांगताना हाकेच्या अंतरावर म्हणण्याची पद्धत आहे. तर असा हा ‘हाक’ शब्द संस्कृतमधील ‘हक्कार’पासून मराठीत आला, तसा इतरही भाषांत विविध रूपांत स्थिरावला. तर याच शब्दाचं मराठीतील आणखी एक रूप म्हणजे ‘हाळी’; हा शब्द संस्कृतमधील ‘आरावलि’पासून - आरोळी – हारळी असा बदलत मराठीत आला. कानडीमधील हाक या अर्थाचा ‘आलु’ शब्दही मराठीतल्या ‘हाळी’शी साधर्म्य दाखवतो.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शब्द व्युत्पत्ती
, शब्दव्यवहार
, साधना गोरे
, मराठी अभ्यास केंद्र
डाॅ.धोंडोपंत मानवतकर
3 वर्षांपूर्वीएकाच शब्दाची विस्तारपूर्वक माहिती सांगणारा सुंदर लेख.
Yogesh Bhavsar
3 वर्षांपूर्वीलेख आवडला छान आहे