“प्रत्येक भाषेची उच्चार करण्याची स्वतःची अशी एख खास पद्धत असते. ती पद्धत योग्य आहे की नाही, आपल्याला म्हणजे ती भाषा ज्यांची नाही त्यांना, ती चांगली वाटते की नाही, ती पद्धत आपल्या सोयीची आहे की नाही, वगैरे गोष्टी पाहण्याची गरज नसते. त्याचं साधं, सोपं कारण म्हणजे ती भाषा आपली नसल्यामुळे आपण ह्या पंचायती करायच्या नसतात!” – भाषाभ्यासक अविनाश बिनीवाले यांचा शब्दोच्चाराविषयीचा लेख
...
‘आमच्यासारखं खणखणीत इंग्लिश तुमच्या सायबाला पण यायचं नाय हं, काय?’ भाषेचा विषय निघो ना निघो, आमचे वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, ज्येष्ठ शेजारी प्राध्यापक दुभाषी अण्णा दिवसातून एकदा तरी आपलं मत आम्हांला ठणकावून ऐकवत असत. त्यांचं नावच दुभाषी, त्यातून ते इंग्लिशचे, नव्हे इंग्रजीचे प्राध्यापक, तेही आमच्या गावातल्या मोठ्या प्रतिष्ठित महाविद्यालयात, त्यामुळे त्यांच्या भाषाविषयक मतांची (ही) जबरदस्त छाप आमच्या (बाल) मनावर स्वाभाविकपणे पडली होती आणि परिणामतः टेबल, टाइम वगैरे उच्चार महाभारतकालीन युद्धातून होणाऱ्या टणत्काराप्रमाणे करायचा सराव आम्ही आमच्या (प्राध्यापक) दुभाषी सरांच्या तालमीत नित्य नियमानं केला होता. फादर, मदर, ब्रदर, सिस्टर, असे इंग्रजीतले उच्चार अधलं-मधलं किंवा शेवटचं, कोणतंही अक्षर न गाळता अत्यंत चोखपणे स्वच्छ, स्पष्ट करण्याचा सरावही आम्ही कसोशीनं करायचो. ‘पाठशाळेंत’ स्पष्ट उच्चार करायला शिकलोंत आम्ही! साहेब काय कप्पाळ शिकवणार आम्हांला? काय शिंचे तोंडातल्या तोंडात पुटपुटतात झालं. म्हणे थंड हवेमुळे तोंड उघडून खणखणीत उच्चार करणं इंग्लंडात शक्य नसतं! लंगड्या सबबी! मुळांत संस्कृतचं वळण नाही नि वर रोजच्या रोज गोमांसाचे रतीब! कशी वळणार जीभ? ह्यांना काय आमच्यासारखं उच्चार जमणारेत?’
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Sanjay Ratnaparkhi
3 वर्षांपूर्वीउत्तम लेख. भाषा शिक्षण गंभीरपणे घेतल्याशिवाय शबद उच्चार सुधारणा होणार नाही.