भाषाविचार - मातृभाषेचा आग्रह : महात्मा गांधी (भाग ३५)


गोध्रा इथे १९१७ साली पहिली राजकीय परिषद झाली. या परिषदेत सगळ्यांनी मातृभाषेत बोलावं अशी गांधींनी विनंती केल्यामुळे लोकमान्य टिळक मराठीतून बोलले. त्यांच्या भाषणाचा श्रोत्यांसाठी हिंदी अनुवाद गांधींनी केला. याचा अर्थ गांधींना मराठीही चांगल्यापैकी येत असलं पाहिजे. त्या परिषदेतले श्रोते खरे भाग्यवान, कारण त्यांना या दोन लोकनायकांना ऐकण्याची संधी मिळाली. ध्वनिमुद्रणाचं तंत्रज्ञान प्रगत असतं आणि दस्तावेजीकरणाबद्दल आपण समाज म्हणून सध्या आहोत तितके निष्काळजी नसतोतर कदाचित आपल्याला आज यातलं काहीतरी ऐकायलाही मिळू शकलं असतं. – महात्मा गांधीजींची मातृभाषेविषयीची भूमिका मांडणारा मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा लेख.
महात्मा गांधी हा भल्याभल्यांना गोंधळात टाकणारा माणूस आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे जसे आहेत, तसेच त्यांच्याबद्दल तीव्र तिरस्काराची भावना असलेले लोकही आहेत. पण कुणालाही त्यांना अनुल्लेखाने मारणं शक्य होत नाही. गांधींसोबत त्यांच्या सावलीप्रमाणे राहिले ते महादेवभाई देसाई यांचे चिरंजीव नारायणभाई देसाई. गांधी त्यांना प्रेमाने 'बाबला' म्हणायचे. नारायणभाईंना दीर्घकाळ गांधींचा स्नेह मिळाला. त्याआधारे त्यांनी ‘अज्ञात गांधी’ नावाचं गुजराती पुस्तक लिहिलं. समकालीन प्रकाशनासाठी सुरेशचंद्र वारघडेंनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. त्यात गांधींच्या चरित्राचे अनेक पैलू कळतात. गांधींची भाषाविषयक भूमिका असं थेट प्रकरण या पुस्तकात नसलं तरी विविध घटना, प्रसंगांतून गांधीजींची भूमिका कळत जाते. त्याचा वेध आपण घेऊ या.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषाविचार , डॉ. दीपक पवार , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen