‘लुगडे’ शब्दाची व्युत्पत्ती जेवढी मजेशीर आहे, तितकीच गोंधळात टाकणारीही आहे. ‘लुगडे’ या शब्दाचे विविध भाषांमधून - फाटलेले - फडके - चिंध्या - वापरण्याचा कपडा - असे अर्थ निघणे स्वाभाविक आहे. मराठीमध्ये मात्र हा सामान्य अर्थ जाऊन ‘लुगडे’ या शब्दाला ‘स्त्रियांचे नेसणे’ असा मर्यादित अर्थ कसा प्राप्त झाला, असा प्रश्न निर्माण होतो. – साधना गोरे यांचा ‘लुगडे’ शब्दाची व्युत्पत्ती सांगणारा लेख -
...
साडी-चोळी हा स्त्रीचा पारंपरिक पोशाख तर आहेच, शिवाय या शब्दांना माहेर, माया, आपुलकी यांचाही स्पर्श आहे. काळाप्रमाणे स्त्रियांच्या या पोशाखात कित्येक बदल झाले आहेत आणि पुढेही होतील. स्त्रीचा साडी हा पेहराव जितका पारंपरिक आहे तितकाच आधुनिकही. काळानुसार साडीची केवळ रूपेच बदलली असे नाही, तर त्याचे शब्दरूपही तितकेच विविधांगी असलेले दिसते.
साधारणपणे मराठीत नऊवारीला लुगडे आणि सहावारी किंवा पाचवारीला साडी म्हणण्याची पद्धत आहे. त्यातही नऊवारीचा पोत, वीण, पदरावरील नक्षी यांप्रमाणे लुगडे आणि पातळ असाही भेद केला जातो. तर सहावारी/पाचवारीलाही ग्रामीण भागात पातळ म्हणण्याची पद्धत आहे. पैकी ‘लुगडे’ शब्दाची व्युत्पत्ती जेवढी मजेशीर आहे, तितकीच गोंधळात टाकणारीही आहे. तलम कापड, रेशमी वस्त्र या अर्थाने संस्कृतमध्ये ‘दुकूलम्’ शब्द आहे. दुगूल - दुगुल्ल - डगूलम् - लुगुड या क्रमाने लुगडे शब्द मराठीत आला, असं कृ. पां. कुलकर्णींनी ‘व्युत्पत्तिकोशा’त म्हटलं आहे. तर दुसरीकडे कुलकर्णी चिंधी या अर्थाच्या संस्कृतमधील ‘लत्ती’ शब्दाचाही संदर्भ देतात. याचे कारण विविध भारतीय भाषांमध्ये ‘लुगडे’ शब्दाच्या अर्थरूपांमध्ये आणि ध्वनिरूपांमध्ये जे साम्यभेद आढळते, त्यात आहे.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शब्द व्युत्पत्ती
, शब्दव्यवहार
, साधना गोरे
, मराठी अभ्यास केंद्र
अनुराधा मोहनी
3 वर्षांपूर्वीअनुराधा मोहनी
3 वर्षांपूर्वीअनुराधा मोहनी
3 वर्षांपूर्वीअनुराधा मोहनी
3 वर्षांपूर्वीअनुराधा मोहनी
3 वर्षांपूर्वीअनुराधा मोहनी
3 वर्षांपूर्वीछान लिहिलंस साधना. काही मुद्द्यांमध्ये थोडीशी भर. महाराष्ट्रीय नऊवारी
अनुराधा मोहनी
3 वर्षांपूर्वीछान लिहिलंस साधना. काही मुद्द्यांमध्ये थोडीशी भर. महाराष्ट्रीय नऊवारी
अनुराधा मोहनी
3 वर्षांपूर्वीछान लिहिलंस साधना. काही मुद्द्यांमध्ये थोडीशी भर. महाराष्ट्रीय नऊवारी
डाॅ.धोंडोपंत मानवतकर
3 वर्षांपूर्वीसंक्षिप्त रूपाने दिलेला संदर्भ छान आहे.
Sanjay Ratnaparkhi
3 वर्षांपूर्वीउत्तम माहितीपर लेख आहे.
Abhay Dhopawkar
3 वर्षांपूर्वीखूपच छान