‘चोळी’ शब्दाचेच आणखी एक रूप म्हणजे ‘काचोळी’. संस्कृतमधील ‘कञ्चुलिका’पासून हा शब्द कंचुलिआ, काचुलिया या क्रमाने मराठीत आला. ज. वि. ओक यांच्या ‘गीर्वाणलघुकोशा’मध्ये ‘कंचुक’ शब्दाचा अर्थ चोळी, अंगरखा, बंडी, वस्त्र, पांघरूण असा दिलेला आहे. म्हणजे लुगड्याच्या अर्थाप्रमाणे, चोळी शब्दही अर्थसंकोच होत केवळ स्त्रियांच्या वस्त्रापुरताच मर्यादित झालेला दिसतो. – ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ सदरातील साधना गोरे यांचा चोळी शब्दाची व्युत्पत्ती सांगणारा लेख -
...
स्त्रियांच्या बांगड्यांपासून ते पैंजणापर्यंतचे अलंकार आजवर किती तरी हिंदी-मराठी चित्रपटगीतांचे विषय झालेले आहेत, स्त्रियांच्या पोषाखाबाबतही हेच म्हणता येईल. साडी-चोळी हा एकच पोशाख घेतला तरी किती तरी गाणी डोळ्यांपुढे फेर धरू लागतील. ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’, ‘दे रे कान्हा चोळी अन् लुगडी’, ‘हात नाक लावू माझ्या साडीला’, ‘चोली के पिछे’, ही त्यातली काही वानगीदाखल नावे. शिवाय, भारुडं, स्त्रीगीतं यांसारख्या लोकगीतांतील लुगड्या-चोळीचे संदर्भ काढायचे तर ते या लेखाला पुरून उरतील, इतके भरतील.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शब्दांची व्युत्पत्ती
, शब्दफोड
, साधना गोरे
, मराठी अभ्यास केंद्र
डाॅ.धोंडोपंत मानवतकर
3 वर्षांपूर्वीअत्यंत कमी शब्दांत विस्तृत माहिती देणारं लेखन.
Yogesh Bhavsar
3 वर्षांपूर्वीलेख आहे