गुंतागुंतीचे विचार मांडण्याची क्रिया लोकभाषेत सोपेपणाने होते, असं एक निरीक्षण केतकरांनी नोंदवलं आहे. 'लोक, सरकारी भाषा आणि लोकभाषा यांत द्वैत राहिल्यास राज्य उत्कर्ष पावत नाही' हे केतकरांचं म्हणणं, स्वातंत्र्योत्तर भारतात लोकांची आपल्या भाषेपासून झालेली - केलेली फारकत लक्षात घेता, सहज समजून येण्यासारखं आहे. केतकरांनी भाषाविकासाचा कार्यक्रमही सुचवला आहे. 'भाषेचा विकास करण्यासाठी जे कार्यकारी मंडळ असेल ते होता होईतो स्वतंत्र मनुष्यांचे असावे, सरकारी नोकर त्यात नसावेत' असं ते म्हणतात. म्हणजे सरकारी नोकर हा काय आजार आहे हे त्यांनी ओळखलं होतं. – मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या भाषाविषयक भूमिकेचा आढावा घेणारा लेख -
...
भारतात कुणालाही विश्वकोशसदृश काम हाती घ्यायचं असेल तर ज्ञानकोशककार केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचं काम लक्षात घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यांच्या कामाचं समाजाने चीज केलं का? याचं उत्तर एकांड्या शिलेदारांच्या द्रष्ट्या कामांची या देशात जितकी दखल घेतली जाते तेवढं चीज झालं, असं म्हणता येईल. केतकरांचं काम उशिरा का होईना डिजिटल स्वरूपात लोकांपुढे आलंय. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने त्यांचं लेखन महाजालावर आणलंय. पण त्याही अगोदर बराच काळ गं. ना. जोगळेकरांनी केतकरांच्या भाषाविषयक भूमिकेचा मागोवा 'भाषा आणि जीवन'च्या दिवाळी १९८४ च्या अंकात घेतलाय. स्वत: जोगळेकर हे साहित्य संस्थाकारणातले कर्ते गृहस्थ होते. महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला पर्याय म्हणून माहिती तंत्रज्ञान आणण्याचा निर्णय घेतला आणि त्याला बहुजनांच्या जागतिकीकरणोत्तर मोक्षाचं अस्तर दिलं. तेव्हा अंगचोरपणा न करता सरकारशी भांडणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी जोगळेकर एक होते. अर्थात, तोपर्यंत महाराष्ट्रात लोकांची मतं त्यांच्या आडनावांवरून बरीवाईट ठरवण्याची प्रक्रिया चांगलीच मूळ धरू लागली होती. त्यामुळे जोगळेकरांची संभावना बहुजनांचे शत्रू म्हणून झाली, यात नवल नाही.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .