संस्कृत भाषेत आघात केव्हा, कुठे द्यायचा ह्याबाबत स्वच्छ, सोपा नियम आहे; जेव्हा जोडाक्षर येतं तेव्हा त्या जोडाक्षरापूर्वीच्या अक्षरावर (सिलॅबलवर) नेहमी आघात येतो. म्हणजे ‘सत्य’ शब्दात ‘त्य’पूर्वीच्या अक्षरावर आघात येईल. आघातांबाबतची संस्कृतची ही परंपरा आधुनिक भारतीय भाषांमध्ये – प्रमाणभाषांमध्ये तत्सम म्हणजे संस्कृत भाषेतून आलेल्या शब्दांबाबत (बऱ्याच प्रमाणात) टिकून आहे. सुदैवाने प्रमाण मराठीत ती अजून निकालात निघालेली नाही! – भाषाभ्यासक प्रा. अविनाश बिनीवाले यांचा भाषेतील आघातांची उदाहरणासह माहिती देणारा लेख -
...
‘हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करा’।। आणि ‘पुण्याची गणना आता भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये होते.’
ह्या दोन वाक्यांतल्या ‘पुण्याची’ ह्या शब्दाचा उच्चार तुम्ही अगदी अचूक केलेला असणार ह्यात काही शंकाच नाही, पण तो सारखा आहे का? तो उच्चार सारखा आहे किंवा नाही ह्याचा विचारही तुम्ही कदाचित कधी केलेला नसेल. मराठी ही तुमची मातृभाषा असल्यामुळे हा विचार करण्याचं एरवी काही कारणही नाही, पण असा प्रश्न (चुकून) कुठे उपस्थित झाला तर मात्र आपली मोठी पंचाईत होते. कारण, असा प्रश्नच कधी पडलेला नसल्यामुळे त्याच्या उत्तराची उठाठेव आपण स्वाभाविकपणे कधी केलेली नसते.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शाब्दांवरील आघात
, शब्दवाचन
, शब्दसंग्रह
, प्रा. अविनाश बिनीवाले
, मराठी अभ्यास केंद्र