भाषाविचार – चेन्नईनामा (भाग ३८)


साधारणपणे आपण असं गृहीत धरून चालतो की, दक्षिणेतली राज्यं आणि पूर्वेकडचं बंगालसारखं राज्य या ठिकाणी प्रादेशिक भाषांची स्थिती चांगली असणार. हा अंदाज खोटा आहे हे प्रत्यक्ष चर्चेत कळून आलं. तमिळनाडूत सीबीएसई आणि आयसीएसई शाळांनी धुमाकूळ घातला आहे. आपल्या मुलांचं शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं हे ठरवण्याचा पालकांना अधिकार नसावा का, असा एक प्रश्न चर्चेला आला. तेव्हा केरळच्या प्रा. पवित्रम् यांनी 'इंग्रजीधार्जिणी व्यवस्था तुमच्यासमोर निवडीचे पर्याय कमी करून ठेवते आणि यातच हिंसा दडलेली आहे', हे सोदाहरण स्पष्ट केले. त्यांचा हा मुद्दा फार महत्त्वाचा होता. – मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार दाक्षिणात्य राज्यांच्या इंग्रजीधार्जिण्या भाषाधोरणाविषयी सांगतायत -
गेली दहा-बारा वर्षं भाषेचं काम करताना मनात सतत एक रूखरूख असायची, ती म्हणजे हे काम अजूनही बहुसंख्य समाजाला महत्त्वाचं आणि आपलं वाटत नाही. आपण एकटे पडलो आहोत की काय असं वाटायचं. प्रचंड काम, तुटपुंजं मनुष्यबळ आणि हातात अपवादाने असणारा पैसा या गोष्टींनी वैफल्य यायचं. सुदैवाने माझे सहकारी संवेदनशील असल्याने आणि बांधिलकी, चिकाटी यात कुठेही कमी पडणारे नसल्याने आम्ही आजवर निभावून नेऊ शकलो आहोत. पण मध्येच वैफल्य दाटून येतं. ही दु:खाची काजळी निघून जावी आणि आकाश निरभ्र व्हावं अशी एक घटना काही दिवसांपूर्वी घडली. तमिळनाडूतल्या तमिळसाठी काम करणाऱ्या विविध गटांनी Promotion of Linguistic Equality या फेसबुक समूहासोबत हा उपक्रम आखला होता. तमिळनाडूमध्ये हिंदीला तीव्र विरोध होता आणि आहे. १९५० साली घटना लागू झाल्यानंतर हिंदी ही देशाची अधिकृत राजभाषा झाली आणि इंग्रजी ही सहअधिकृत भाषा झाली. घटनेच्या अंमलबजावणीनंतर पंधरा वर्षांनी म्हणजे १९६५ साली हिंदीने इंग्रजीची जागा घ्यावी असं अपेक्षित होतं. या बदलाचा अंदाज आल्याने १९६०च्या दशकाच्या सुरुवातीलाच तमिळनाडूमध्ये हिंदीविरोधी आंदोलन सुरू झालं. शासनाने १९६५ साली प्रत्यक्षात असा निर्णय घेतल्यावर त्याला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर आले. तत्कालीन काँग्रेस शासनाने गोळीबाराचे आदेश दिले. अनेक लोक मारले गेले. अशा वातावरणात लोकांचा सरकारी आकड्यांवर अजिबात विश्वास नसतो. तसा तो आजही नाही. त्यामुळे या आंदोलनाच्या पन्नाशीनिमित्त चेन्नईत झालेल्या 'भारतीय भाषा अधिकार परिषदे'त सुद्धा लोक या आंदोलनाबद्दल भावुक होऊन बोलले.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मातृभाषा , तामिळनाडू राज्य , डॉ. दिपक पवार , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen