विज्ञान, तंत्रज्ञान आणि मराठी भाषा


रशियात पूर्वी असा एक नियम होता, की ज्या कोणा रशियन माणसाला नोबेल पुरस्कार मिळेल, त्याने रशियन टीव्हीवर येऊन लोकभाषेत त्याचे संशोधन समजावून सांगितले पाहिजे. लोकभाषेच्या महत्त्वाबरोबरच कोणतीही गोष्ट समजावून सांगताना जर त्याचा व्यवहाराशी संबंध जोडला तर ते ऐकणाऱ्याला चटकन समजते. – विज्ञान-तंत्रज्ञान लोकभाषेत का आणायचे, याचे विविध दाखले देत लोकभाषेचे महत्त्व अधोरेखित करणारा मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ.पा. देशपांडे यांचा लेख -
या परिसंवादाचा विषय ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि मराठी’ असा आहे. पण मराठी म्हणजे काय? मराठी माणूस की मराठी भाषा की मराठीची वाटचाल की मराठीची अधोगती की मराठीची गळचेपी? सोयीसाठी मी माझ्यापुरता हा विषय ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि मराठी भाषा’ असा ठेवला आहे.
१८१८ साली इंग्रजी अंमल सुरू झाला. पुण्याच्या शनिवारवाड्यावरील भगवा झेंडा उतरवला जाऊन ब्रिटिशांचा युनियन जॅक वर चढवला गेला. त्यापूर्वी लोकांच्या बोलण्यात मराठी भाषा होती, पण ती निर्भेळ मराठी भाषा होती का? जेव्हा दोन भाषक लोक, दोन धर्मांचे लोक, दोन पंथांचे लोक, दोन प्रांतांचे लोक, दोन देशांचे लोक एकत्र येतात; तेव्हा लोकांच्यात रोटी-बेटी व्यवहार होऊ लागतात आणि त्याचा परिणाम भाषेवर नकळत होतो. इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानात अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वी व्यापारानिमित्त इंग्रज येथे आलेच होते. पण त्यावेळी अंमल त्यांचा नव्हता. त्यापूर्वी मुसलमानांचा अंमल असल्याने मराठी भाषेत फारसी, उर्दू आणि पर्शियन शब्दांचा भरणा खूप होता. इतिहासकार ग. ह. खरे यांच्या एका निबंधात शिवाजीच्या एका पत्राचा उल्लेख आहे. या पत्रात १५० पैकी १४५ शब्द उर्दू वा पर्शियन होते, कारण शिवाजी महाराजांपूर्वी तीनशे वर्षे महाराष्ट्रावर मुसलमानांचे राज्य होते. राज्य ज्याचे त्याच्या भाषेचा प्रभाव बोलीभाषेवर पडतो. आणि तो केवळ शिवाजीच्याच काळी होता असे नसून मराठीतील सुप्रसिद्ध कवी माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांच्या काव्यावरही बऱ्यापैकी असल्याने साहित्यिक अनंत काणेकर त्यांना म्हणाले होते की, ‘जरी या मराठमोळ्या शिवबास बोध व्हावा, तरी फारसी-मराठी, मज कोश पाठवावा!’ इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान नव्हते असे नाही, पण आज त्याला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणतो ते खऱ्या अर्थाने इंग्रजी अंमल सुरू झाल्यावरच आले. आणि ते इंग्रजांमुळे आल्याने साहजिकच ते इंग्रजीत आले. त्यासाठी त्यांनी आल्या-आल्या इंग्रजी पाठशाळा सुरू केल्या. पण हेही  विसरून चालणार नाही, की १८२५ -२६ सालच्या सुमारास माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने सांगितल्यावरून जॉर्ज जर्व्हिस याने इंग्रजीतील पुस्तकांची मराठीत भाषांतरे करवून घ्यायला सुरुवात केली. त्याचे कारण त्यांना त्यांच्या पद्धतीने इंग्रजी भाषेत असलेले शिक्षण मराठीतून द्यायचे होते आणि इंग्रजी अमलाखालील राज्य चालवण्यासाठी कारकून तयार करवून घ्यायचे होते.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विज्ञान , तंत्रज्ञान , मराठी भाषा , मातृभाषा , अ.पां. देशपांडे , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Abhinav Benodekar

      2 वर्षांपूर्वी

    मी नववी ते अकरावी तांत्रिक विषय (technical)मराठीत आणि पुढे पदवीकेला, (Diploma in technical education )तेच विषय इंग्रजीत शिकलो. काही अडचण नाही दोन्ही भाषांत, पण पॉलीटेकनिक मध्ये आणि नोकरीतसुद्धा उगीचच इतरांसारखे "मराठीत समजत नाही तांत्रिक विषय!"असे म्हणत शान मारीत राहिलो; हे सत्य!!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen