भाषाविचार - चेन्नई ते जालंधर (भाग ३९)


  भारतीय भाषांच्या परिषदेत अवधीडोगरीमैथिली अशा बोलींच्या प्रश्नावरचे निबंध होते. काही लोकांनी स्थलांतरितांच्या भाषिकसामाजिक प्रश्नांचा विचार केला होता. त्यात दिल्लीमध्ये स्थलांतरित झालेल्या केरळी लोकांचा प्रश्न होतातर सौराष्ट्रातून मदुराईत स्थलांतरित झालेल्या सौराष्ट्री भाषकांचा आठ-नऊशे वर्षांचा इतिहासही होता. काश्मिरी दहशतवादाच्या कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिथल्या मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण न मिळणं आणि त्यातून आलेलं तुटलेपणअसं म्हैसूरच्या केंद्रीय भारतीय भाषा संस्थानचे निवृत्त अध्यक्ष ओंकारनाथ कौल यांनी मांडलं. - मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार भारतीय भाषांच्या परिषदेतील अनुभव सांगतायत - 
जालंधरच्या ‘पंजाबी भाषा अकादमी’ आणि ‘पंजाबी अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेस अँड लिटरेचर’ यांनी आयोजित केलेल्या भारतीय भाषांच्या परिषदेचा आपण या लेखात विचार करणार आहोत. पंजाबी विद्यापीठातले माझे मित्र आणि भाषिक चळवळी, भाषिक राजकारण यांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. जोगासिंग विर्क आणि प्रा. सुखविंदर सिंग सांघा यांच्या पुढाकाराने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरातल्या १५ राज्यांतून ७० अभ्यासक निबंध वाचनासाठी आले होते. नेपाळमधील दोन प्रतिनिधीही आले होते. त्यांनी शिक्षणाचं माध्यम, सामाजिक समानता आणि प्रादेशिक भाषा, परिभाषेची निर्मिती, दुसरी भाषा शिकण्याची प्रक्रिया, स्थलांतर आणि भाषिक संघर्ष, जनगणना आणि भाषेचं राजकारण, अशा अनेक विषयांवर चर्चा केली. मी परिसंवादात उद्घाटनपर भाषणासाठी गेलो होतो. तीन दिवसांचा हा अनुभव माझं भाषिक भान वाढवणारा तर ठरलाच, शिवाय भाषेच्या चळवळीसाठी काम करणारे नवे मित्र मिळाले. अभ्यासक आणि कार्यकर्ते यांच्यात सांधेजोड होण्याची शक्यता वाढतेय असं दिसलं. आश्चर्य म्हणजे लहान मुलांसोबत काम करणाऱ्या मूळच्या ओरिसाच्या असलेल्या लुलबी पटनायक नावाच्या एक अभ्यासक म्हणाल्या की, ‘भाषिक चळवळीच्या कार्यकर्त्यांशी जोडून घेतलं पाहिजे, प्रश्न दोन्ही अंगाने समजून घेतले पाहिजेत’. हे ऐकून बरं वाटलं. अन्यथा असं दिसतं की, विद्यापीठीय विचारवंत मंडळींच्या लेखी विषय भाषेचा असो की इतर कुठलाही असो, कागद रंगवणं आणि पारिभाषिक शब्दांच्या जंजाळात सगळं अडकवून आपल्या निबंधाचा आयएसबीएन क्रमांक असलेल्या पुस्तकात समावेश होईल असं पाहणं, यालाच महत्त्व आलं आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चेन्नई , भाषाशास्त्र , डॉ. दीपक पवार , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen