अंक – श्रीसरस्वती, श्रीशिवराज विशेषांक, १९६१ ********** प्रास्ताविकः- शिवजन्मकालीन महाराष्ट्र - अकराव्या, बाराव्या शतकांत सरासरी दीडशे वर्षे महाराष्ट्रावर यादवांचे राज्य होते; त्या अवधीत मराठीचे स्वराज्य होते. परंतु त्या स्वराज्यावर उत्तरेकडून मुसलमानांच्या स्वाऱ्या आल्या आणि यादवांचे महाराष्ट्रातील राज्य नष्ट झाले. तेव्हापासून म्हणजे तेराव्या शतकाच्या मध्यापासून मुसलमानांची सत्ता सुरू झाली. भारताप्रमाणे महाराष्ट्र या ना त्या मुसलमानी सत्तेखाली राबू लागला. हीच परिस्थिती, शिवजन्मकाळी होती. शिवजन्माच्या वेळी महाराष्ट्रावर बव्हंशी मुसलमानांची सत्ता होती. हिंदु धर्मावर मुसलमानांची सारखी आक्रमणे होत होती. जुलमाने धर्मांतर केले जाई, हिंदु स्त्रियांचे हरण करून त्यांना भ्रष्ट करण्यांत येई, स्त्री-पुरुषांना आणि बालबालिकांनाही गुलाम करून परदेशी पाठविण्यांत येई, देवाची मंदिरे आणि मूर्ति भग्न करून त्या मंदिरांच्या जागी मशिदी बांधण्यांत येत. लष्कराचा त्रास होऊन खेडेविभागांत आणि शहरी विभागांत केव्हा नुकसान होईल याचा नेम नसे. अशी परिस्थिती असूनही ब्राह्मण, प्रभू, मराठा इत्यादी महाराष्ट्रीय मंडळी यवन राज्यकर्त्यांची नौकरी करीत. राज्यकारभारांत, लष्करांतही अधिकाराच्या जागा स्वीकारून महाराष्ट्रीयांवर, वैदिक धर्मावर आणि गाईब्राह्मण इत्यादिकांवर होत असलेला अत्याचार नुसते निमूटपणे पाहतच त्यांना स्वस्थ बसावे लागे. एवढेच नव्हे तर, तो अत्याचार करण्यांत पुढाकारही घेणे भाग पडे. त्यांत एकमेकांविरुद्ध द्वेष, शत्रुत्व आणि कुटुंबाकुटुंबान्तर्गत वैमनस्य असल्यास प्रतिपक्षास राजसत्तेच्या आश्रयाखाली नामोहरमसुद्धा केले जाई. असो. शिवजन्माच्या वेळी महारा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
amolss
5 वर्षांपूर्वीभोसले घराणे हे मुधोळच्या घोरपडे घराण्याची एक शाखा.ते मुधोळ सोडून वेरूळ येथे स्थायिक झाले. शहाजीराजांचे पणजोबा निजामशाहीमध्ये सरदार होते व त्यांच्याकडे पुणे,सुपे प्रांताची जहागिरी होती.सिंदखेडचे लखुजी जाधव व वेरूळचे मालोजीराजे भोसले हे निजामशाही मध्ये सरदार होते. इसवी सन सोळाशे मध्ये शहाजीराजांचा जन्म झाला. वयाच्या पाचव्या वर्षी शहाजीराजांना जहागिरी मिळाली. अंदाजे १६२१ मध्ये शहाजीराजांचा व जिजाबाईंचा विवाह झाला. त्यावेळी निजामशाहीमध्ये मलिक अंबर नावाचा एक श्रेष्ठ मुत्सद्दी व उत्कृष्ट सेनापती वजीर म्हणून होता.१६२४ मध्ये मोगल व आदिलशहा यांनी निजामशाही विरुद्ध संयुक्त मोहीम काढली.अहमदनगरजवळील भातवडी येथे खूप मोठी लढाई झाली व या दोन्ही संयुक्त फौजांचा पराभव झाला.या लढाईमध्ये शहाजीराजांनी मोठा पराक्रम केला व त्यांनी अत्यंत प्रभावीपणे युद्धतंत्र वापरले.या लढाईमुळे शहाजीराजांना निजामशाहीत वजन प्राप्त झाले व प्रसिद्धी मिळाली त्यामुळे वजीर मलिक अंबर व शहाजीराजांचे पटेनासे झाले.त्यामुळे शहाजीराजांनी निजामशाही सोडली व आदिलशाहीला मिळाले.इ.स. १६२७ मध्ये दख्खनच्या राजकारणातील तीन प्रमुख सत्ताधीश मरण पावले.दिल्लीचा जहांगीर बादशहा,दौलताबादचा निजामशाहीचा वजीर मलिक अंबर तसेच विजापूरचा इब्राहिम आदिलशहा या तिघांच्या मृत्यूमुळे दक्षिणेच्या राजकारणाचे रंग झपाट्याने पालटले या बदललेल्या परिस्थितीत शहाजीराजे आदिलशाही सोडून पुन्हा ते निजामशाहीत रुजू झाले.परंतु अंतर्गत राजकारणे,बेदिली,खुनाखूनी यामुळे निजामशाही पोखरलेली होती.या अशाच एका प्रकरणात इ.स २५ जुलै १६२९ रोजी शहाजीराजांचे सासरे,सिंदखेडचे लखुजी जाधवराव यांचा त्यांच्या चारही मुलांसह भर दरबारात खून करण्यात आला.या सर्व घटनांमुळे पुढे शहाजीराजांच्या मनात स्वतंत्र राज्य स्थापनेची बीजे रुजली असावीत असा तर्क केला तर तो चुकीचा ठरणार नाही व हेच ते स्वातंत्र्याचे पहिले स्वप्न.परंतु त्याच वेळी दिल्लीचा नवीन बादशाह शहाजहानने निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने एका मोठ्या मोहिमेची सुरुवात केली. मोगलांच्या या मोहिमेमुळे निजामशाही व आदिलशाही गुंतून पडतील असा विचार करून शहाजीराजांनी त्यांच्या जहागिरीचा पुणे सुपे प्रांत स्वतंत्र म्हणून जाहीर केला. देवगिरीचे महाराष्ट्रातील यादव राज्य संपल्यानंतर तीनशे वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर महाराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापनेचा जाणीवपूर्वक प्रयत्न प्रथमच होत होता.परंतु यामुळे चिडून जाऊन आदिलशाहीने सरदार मुरार जगदेव यांच्यामार्फत पुणे जहागीर बेचिराख व उध्वस्त करून टाकली. यानंतर शहाजीराजे मोगलांकडे सरदार म्हणून रुजू झाले. इ.स.१६२९,१६३० व १६३१ ही वर्षे खूप मोठ्या दुष्काळाची होती.अस्मानी व सुलतानी संकटाने पुरा महाराष्ट्र भरडून निघाला होता. मोगल व आदिलशाहीच्या संयुक्त आक्रमणापुढे निजामशाही पूर्ण बुडणार हे स्पष्ट दिसू लागले.इ.स.१६३३ मध्ये शहाजीराजांनी पेमगिरी किल्ल्यावर अटकेत ठेवलेल्या अल्पवयीन मुर्तजा निजामशहाला सोडवले व त्याच किल्ल्यावर निजामशाहीच्या गादीची पुन्हा स्थापना केली. नामधारी निजामशहाच्या मार्फत ते स्वतः राज्यकारभार करू लागले.निजामशाही संपणार असे दिसू लागल्यानंतर शहाजीराजांनी जे राजकारण केले ते हिंदुस्तानच्या शेकडो वर्षांच्या राजकारणात पूर्णपणे वेगळे आहे.सर्व गोष्टी प्रतिकूल असताना एका बुडणाऱ्या सत्तेची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन ते एकाच वेळी चार बलिष्ठ शत्रूविरुद्ध लढण्यासाठी उभे ठाकतात याचा अर्थ शहाजीराजांना एक स्वतंत्र राज्य स्वतःच्या मनगटाच्या जोरावर उभे करायचे होते.हा शहाजीराजांचा स्वातंत्र्याचा दुसरा प्रयत्न.व हीच विजिगीषु वृत्ती शिवाजीमहाराजांच्यात पुरेपूर उतरली होती.आदिलशहाच्या मदतीने शहाजीराजांनी मोगलांनी जिंकलेला मुलुख परत घेण्यास सुरुवात केली.या कालखंडात त्यांनी गनिमी युद्धतंत्राचा अतिशय प्रभावी वापर केला इ.स.१६३३ ते १६३५ हा काळ शहाजीराजांच्या दृष्टीने अत्यंत भरभराटीचा गेला. शहाजीराजे व त्यांच्या सहकाऱ्यांना या काळात राजकारण,प्रशासनयंत्रणा स्वतंत्रपणे चालवण्याचा चांगला अनुभव मिळाला.परंतु इ.स.१६३६ मध्ये पुन्हा मोगंल व आदिलशाही एकत्र आले व त्यांनी शहाजीराजांचा हा प्रयत्न संपुष्टात आणला. इ.स. १६३६ च्या तहानंतर निजामशाही संपली,तिच्या मुलखाची वाटणी झाली व शहाजीराजांना आदिलशाहीची चाकरी करणे भाग पडले.पूर्ण पराजय झाला तरी शहाजीराजे ताठ कण्याने उभे होते. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी आपली पुणे जहागिरी परत मागून घेतली.तसेच रणदुल्लाखानाकडून कान्होजी जेधे,लोहकरे बंधू,दादोजी कोंडदेव हे मावळ भागातील अतिशय कर्तबगार मोहरेही मिळवले.त्यांनी निवडून जवळ केलेली सर्व माणसे शेवटपर्यंत त्यांच्यासोबत तसेच शिवाजी महाराजांच्या सोबत राहिली. नंतर त्यांनी १६४२ मध्ये जिजाबाईसाहेब व शिवरायांना बेंगरूळहुन पुण्याला पाठविले. कर्नाटकमध्ये शहाजीराजे एक राज्य तयार करीत होते त्याचवेळी पुण्यामधील त्यांच्या जहागिरीमध्ये सुद्धा तोच प्रयत्न सुरु होता.दादोजी कोंडदेवना आदिलशाही सुभेदार म्हणून पुणे जहागिरीमध्ये पाठविले व सोबत शिवरायानां पेशवे,मुजुमदार,डबीर, सबनीस असे मंत्रिमंडळ दिले. म्हणजेच शहाजीराजे स्वातंत्र्याचे स्वप्न अजूनही जगत होते.कोणीही पराक्रमी, विश्वासू ,कामाचा माणूस आढळलाकी शहाजीराजे त्याला पुण्याला पाठवून देत.शिवाजीराजांची मुद्रासुद्धा शहाजीराजांनीच तयार करून घेतली. हीच संस्कृत राजमुद्रा शिवाजीमहाराजांनी आयुष्यभर वापरली. त्यांची दूरदृष्टी प्रचंड होती.एक स्वतंत्र व सार्वभौम सत्ताधीश होण्याची बीजे शहाजीराजांनीच जिजाबाईंच्या मदतीने शिवाजीराजांमध्ये रुजवली व वाढवली. शहाजीराजांच्या निर्णयांचा शिवाजीमहाराजांना भविष्यात प्रत्यक्षात व अप्रत्यक्षात फायदाच झाला आहे. तत्कालीन कवी व विद्वान जयराम पिंड्ये लिखित शहाजीराजांचे चरित्र "राधामाधवविलासचंपू" यामध्ये शहाजीराजांचा जीवनक्रम व दिनचर्या याचे सुरेख वर्णन आहे. यावरून शिवाजीमहाराज यांना स्वराज्य स्थापन करून स्वधर्म रक्षण करावयास स्फूर्ति देणाऱ्या म्हणजे जिजाबाई आणि शहाजीराजे ह्या व्यक्ती होत हे निर्विवाद होय.
amolss
5 वर्षांपूर्वीउत्तम माहितीपूर्ण लेख. देशपांडे साहेबानी एकेरी उल्लेख टाळला असता तर त्यांच्या बद्दल सुद्धा आदर राहिला असता. असो तरीही त्यांना धन्यवाद.
[email protected]
5 वर्षांपूर्वीनमस्कार
[email protected]
5 वर्षांपूर्वीलेख महिपूर्ण आहे, देशपांड्यानी शहाजी राजांचा व शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख अजिबात आवडला नाही.