fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

चंद्रा तुझा चक्काचूर होणार!

अंक – हंस, फेब्रुवारी १९५६

चंद्र हा आपल्या भावविश्वाचा अनिवार्य भाग आहे. गंमत म्हणजे चंद्राबाबतचं सत्य सर्वांनी स्वीकारुनही आता दशके लोटली आहेत, चंद्रावर मानवानं प्रत्यक्ष पाऊल ठेवलं त्यालाही पन्नास वर्षे झाली आहेत, परंतु आपल्या मनातल्या चंद्राचं त्यानं काहीही बिघडलेलं नाही. ‘दमभर जो उधर मूंह फेरे ओ चंदा’  असं म्हणणारी नायिका १९५१ साली होती, तर १९९९ साली ‘चांद छुपा बादल मे’ म्हणणारा नायक आला. ‘चंद्र आहे साक्षीला’ म्हणत चंद्राला आपण हक्काने वेठीला धरतो.  साधारण १९५० सालापासून माणसाच्या  चंद्रावर जाण्याची चर्चा सुरु झाली होती. तेंव्हा आता चंद्राच्या उपमा, चंद्राविषयीची स्वप्न, चंद्राच्या प्रतिमा याचं काय होणार असं अनेकांना वाटू लागलं. जे स्वतः विज्ञानाचे अभ्यासक होते आणि लेखकही होते त्यांना तर हे जास्तच जाणवू लागलं…चंद्रविषयक कल्पनांचा चक्काचूर..हा  मजेशीर लेख त्याच विवंचनेतून साकार झालेला आहे. ‘हंस’च्या १९५६ सालच्या अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.

डॉ. चिंतामण श्रीधर कर्वे ( जन्म – २५ डिसेंबर १९१४) हे मराठी विज्ञानलेखक होते. ठाणे येथील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या  सरस्वती सेकंडरी स्कूलचे ते संस्थापक विश्वस्त होते. अग्निबाण, अणूशक्ती शाप की वरदान, अणूकडून अनंताकडे, चला अन्य ग्रहांवर, चला चंद्राकडे, चला चंद्रावर स्वारी करूया अशी त्यांची अनेक  पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 2 Comments

  1. किती अभ्यासपूर्ण लेख आहे
    डोळ्यासमोर चित्र उभे राहिले

  2. पृथ्वी आणि चंद्र यांचे आकर्षण . विस्तृत वर्णन.

Leave a Reply

Close Menu