कथा : काळरात्र (ऑडीओसह)

अंक : माणूस, १५ ऑगस्ट १९६६

नारायण धारप (२७ ऑगस्ट १९२५-१८ ऑगस्ट २००८) यांचे नाव घेता क्षणी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते काळोखी रात्र, त्या काळोखात लपलेलं एक सैतानी साम्राज्य आणि भयाची आपल्या शरीरातून जाणारी एक थंड लहर. मराठीत भयकथा लिहिणारांची कायमच वानवा राहिलेली आहे, धारपांचे लेखन त्यामुळेच अधिक महत्वाचं. त्यांनी ‘समर्थ’ ही व्यक्तिरेखा जन्माला घालून समर्थांच्या धाडसी कथाही लिहिल्या. धारपांच्या कादंबऱ्या आणि कथासंग्रह यांची संख्या पन्नासाहून अधिक आहे. प्रस्तुत कथा म्हणजे नारायण धारप यांनी इग्लिश कथा लेखक W.F.Harvey यांनी १९१० मध्ये लिहिलेल्या August Heat या विख्यात भयकथेचा अनुवाद आहे. ‘ भयकथा’ या साहित्य प्रकाराचे वाचन सुरू करायचे असल्यास सुरूवात या कथेपासून करावी, असे पाश्चिमात्य साहित्यविश्वात सुचवले जाते. भयकथा वाचणे आणि ऐकणे असा  दुहेरी अनुभव आज पुनश्चच्या वाचकांना देत आहोत.  १९६६ साली माणूस साप्ताहिकात प्रथम प्रसिद्ध झालेली कथा तुमच्यासाठी पुनश्च…

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 11 Comments

 1. ssamant635@gmail.com

  भयकथा नाही पण गुढ कथा आहे .

 2. ppkchemicals@gmail.com

  खुप वर्षें झाली धारप वाचलेच नाहीत रहस्यकथा आवडत आसत ईंगलीश जेम्स हँडली चेस व आगथा कि्सती वाचत आसे. धारप पण वाचलेत

 3. LekhaTrailokya

  नारायण धारप यांच्या कथा उत्तमच असतात. त्यांच्या कथांना योग्य तो न्याय त्यांच्या काळात मिळाला नाही असं नेहमी वाटत राहिलं आहे. मानवी मनाला भयाची ओढ मुळात असावी. अतर्क्य गोष्टींवर विश्वास न ठेवणारा माणूस ही धारपांच्या कथा आवडीने वाचतो. हे त्यांच्या कथांच यश म्हणावं लागेल. त्यांच्या सगळ्या कथा देणार आहात का? मला समर्थ या पत्राची सुरुवात कुठुन झाली याची खूप उत्सुकता आहे. बरंच शोधूनही पहिली समर्थ कथा सापडली नाही. ती कुठली, कुठे मिळेल याची काही माहिती देता येईल का?

  1. सुरेश माणिकराव कुळकर्णी ( सु.मा.)

   मी सभासद होऊ इच्छितो

   1. किरण भिडे

    कृपया ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा

  2. sumamata@gmail.com

   छान कथा पण एकदम संपली असा चटका लावणारी

 4. advshrikalantri@gmail.com

  मी अभिप्राय नोन्दविला आहे

 5. advshrikalantri@gmail.com

  कथा व्यवस्थित ठिकाणी सम्पवली आहे. सर्व पर्याय खुले आहेत. चित्रकार आपल्या घरी परत जाईल आणि दोघेही आश्चर्य करीत हा प्रसंग आठवत राहतील .

 6. atmaram-jagdale

  छान आहे कथा . भयकथा असून भय काही वाटले नाही परंतु लेखकाने बारीक-सारीक गोष्टी चे केलेले वर्णन त्यातून उभे केलेले प्रसंग हे खूपच चित्र स्पर्शी असे वाटले कथा आवडली .

 7. shripad

  वा, मस्त! धारपांबद्दल काही बोलायला नकोच. वाटवेंनी वाचली देखील छान आहे.

 8. ajitpatankar

  कथा उत्तम आहे.. अनुवाद उत्तमच आहे.. मात्र भयकथा वाटत नाही.. थ्रिलर जरूर आहे..

  अभिवाचन उत्कृष्ट .. आवाज माईकला अगदी योग्य… अभिवाचन करणाऱ्याने सुरुवातीस किंवा शेवटी आपले नाव सांगावे.. श्रेय घ्यायलाच हवे..

Leave a Reply