जीवनाचा आनंद

पुनश्च    काका कालेलकर    2021-03-06 06:00:02   

अंक – सत्यकथा – जून, १९५१

लेखक – काका कालेलकर

आनंद क्षणिक असतो हाच मोठ्यांत मोठा आनंदाचा विषय आहे. लहान मूल गोड हंसते. पण जर का ते सदान्कदा हंसतच राहिले तर त्याची नि आपली काय दशा होईल? म्हणूनच माणसाने अखंड आनंदाचा आग्रह बाळगतां कामा नये. कित्येक आनंद क्षणमयच असतात. हीच त्यांची परमसिद्धी असते.काळवेळेनुसारच आनंदाची अपेक्षा ठेवली पाहिजे. त्यांत प्रसंगोचित औचित्यही असले पाहिजे. पण मुख्य गोष्ट म्हणजे आनंद परिमित असला पाहिजे. पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे आनंद भोगरूप होतां कामा नये. भोगाबरोबर कंटाळा असतोच; पण क्षीणताही असते. माणसाला भूक लागते व तो खातो. त्यांत सुख असते, समाधान असते. पण हा उच्च प्रकारचा आनंद नव्हे. कारण तो भोगरूप आहे. म्हणूनच समर्थ नाटककार नाटकांत कोठेही खायचे प्रसंग आणित नसतात. आजकालच्या नवलकथांत खाण्याच्या रसाची वर्णने येतात. त्याचे कारण नवलकथाकार आपल्या आसनावरून खाली उतरले आहेत. शृंगारही दोन असतात. विप्रलंभ व संभोग. यांत विप्रलंभ शृंगार यामध्ये अधिक सुंदर. आनंद भोगप्रधान व भावनाप्रधान असा दोन प्रकारचा असतो. भोगप्रधान आनंद क्षणजीवी असतो. माणसाला क्षीण करणारा असतो. असला आनंद दीर्घकाल मिळाला तर माणसाची आनंद भोगण्याची शक्तीही निकामी बनते, बोथट होऊन जाते.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सत्यकथा , चिंतन
चिंतन

प्रतिक्रिया

 1. Shankar Junghare

    2 आठवड्या पूर्वी

  खुप छान लेख आहे. वाचुन आनंद वाटला. काकाजी आपणास शतशः प्रणाम.

 2. Santoshkumar Ghorpade

    2 महिन्यांपूर्वी

  सुंदर विवेचन केलंय काकाजींनी

 3. Suresh Kulkarni

    2 महिन्यांपूर्वी

  कहा जाय तो आनंद का स्वरूप मालूम नही था ।वह कुछ कुछ आज समझा, और मेरे घर के परिसर में बगीचा लगाने के लिए जगह नही यह दुःख अब नही हो रहा है। क्योंकि मेरे सामने वाले पड़ोसी और बाजू के पड़ोसी की गार्डन और फूल पौधे मुझे आनंद देने लगे है।

 4. atmaram jagdale

    2 महिन्यांपूर्वी

  खुपचं सुंदर लेख . संपूच नये असे वाटत होतं . महान व्यक्त्तिमत्वा चे लोक किती सतज सोप्या भाषेत जीवनाबदल बोलतात .वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.