अंकः लोकसत्ता, दिवाळी, २००१
लेखाबद्दल थोडेसे : संगीत आणि काळ यांचा अन्योन्य संबंध आहे. त्या त्या काळाचा ठसा संगीतांवर, संगीत रचनांवर, गायकीवर पडल्याचे आपल्याला दिसते. संगीत मुद्रित करण्याचे आणि मुद्रित केलेले संगीत हवे तेंव्हा ऐकण्याचे तंत्र उपलब्ध झाल्यावर संगीताचा वेगाने प्रसार झाला आणि त्याचाही संगीतावर विविध प्रकारे परिणाम झाला. मुद्रित करण्याचे आणि मुद्रित केलेले संगीत हवे तेंव्हा ऐकण्याचे तंत्र गेल्या दीडशे वर्षात सतत बदलत आले, ते अधिकाधिक सुलभ आणि सामान्यांच्या आवाक्यातले होत गेले. असे असले तरी तबकड्यांचा म्हणजे प्लेइंग रेकॉर्डसचा सुरुवातीचा काळ म्हणजे एक प्रकारे अनेकांचा सुवर्णकाळ होता. त्या काळात तबकडीचा झालेला प्रवास आणि तिचे विस्तारित होत गेलेले साम्राज्य सांगणारा हा लेख
सुरेश चांदवणकर हे पेशाने शास्त्रज्ञ आणि छंदाने संगीतवेडे रेकॉर्ड कलेक्टर. रेकॉर्ड कलेक्टर्सच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्ये ते लोकप्रिय आहेत. त्यांच्याच अभ्यासातून साकारलेला हा लेख
********
ऑक्टोबर १९०२! शंभर वर्षांपूर्वी फ्रेडरिक विल्यम गैसबर्ग आपला सहकारी जॉर्ज डिलनट याला घेऊन ‘कॉरोमँडल’(Coromandel) या १८६८ मध्ये बांधलेल्या बोटीवरून पूर्वेच्या मोहिमेवर निघाला! ग्रामोफोनचा शोध लागला होता अमेरिकेत! १८७७ साली एडिसनने त्याचे पेटंटही घेतले होते. पण या शोधाचा खरा प्रचार व प्रसार केला एमिली बर्लिनर या मूळ जर्मन, पण नंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या कारकुनाने! फावल्या वेळात विजेची उपकरणे व ग्रामोफोनवर त्याचे प्रयोग चालू असत. त्याच्या डोक्यातून भन्नाट कल्पना निघत! एडिसनचा शोध पोकळ नळकांड्या (सिलिंडर) वर होता, तर बर्लिनरने त्याऐवजी सपाट तबकडीची कल्पना प्रत्यक्षात आणली. चरख्यासारख्या दिसणाऱ्या हाताने फिरवायच्या यंत्रावर पाच/सात इंच व्यासाची मेणाची/जस्ताची ध्वनिमुद्रिका ठेवून तिच्यावर धातू/बांबूची अणकुचीदार सुई टेकवली की अस्पष्टसा आवाज ऐकू येई.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
लोकसत्ता दिवाळी अंक
, इतिहास
, विज्ञान आणि तंत्रज्ञान
, ज्ञानरंजन
ज्ञान रंजन
Renkoji Dahe
4 वर्षांपूर्वीअरे बापरे.. शिर्षक सुईच्या अग्रावर..पण संपूर्ण लेखाने ग्रामोफोनचा, रेकाॅर्डस् चा जागतिक प्रवास उत्तम रीतीने घडवून आणला. जन्मकथा ते जागतिक विस्ताराचा इतिहास उलगडला. लेखकाच्या साधनेची प्रचिती आल्याशिवाय रहात नाही..धन्यवाद, पुनःश्च.!✍????????