अंक : सत्यकथा’, ऑक्टोबर १९५६
टीकाकार माझ्या विनोदाला बुद्धिनिष्ठ विनोद म्हणतात. साहित्य आणि साहित्यिक याभोवतीच माझा विनोद घोटाळत राहतो. त्यामुळे माझ्या वाचकांचे वर्तुळ फार मर्यादित होते, असाही एक आरोप माझ्या लिखाणावर केला जातो. धुंडिराज, कामण्णा, पांडुतात्या, चिमणराव, दाजी ह्यांच्यासारखी विनोदी व्यक्तिरेखा मी मराठीच्या कुटुंबात आणून सोडली नाही, असेही म्हणण्यांत येते, ते काही अंशी खरेही आहे. परंतु अशी व्यक्ती जरी आणली नाही तरी अशा व्यक्तींचा समूह मात्र मी ‘बटाट्याची चाळ’ बांधून आणला. ह्या चाळीत माझी जीव रमतो. ही सर्व मंडळी मला आवडतात. सोकरजी त्रिलोकेकर, अण्णा पावशे, एच्च. मंगेशराव, म्हळसाकांत पोबुर्पेकर, नागूतात्या आढ्ये वगैरे मंडळी ह्या चाळीत राहतात, धडपडतात, रुसतात, रागावतात, पुन्हा एकत्र होतात. दोन खोल्यांच्या बिऱ्हाडांत राहणारी ही जनता अमर आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Vinesh Salvi
4 वर्षांपूर्वीधन्यवाद...बहुविध...