प्रत्येक धर्मात खाद्य-निर्बंध घातलेले आहेत. इस्लाम त्याला अपवाद नाही. कुराण, हदिस आणि उलेमांनी लिहिलेल्या काही ग्रंथांत त्यांचे उल्लेख आढळतात. कुराणात डुक्कराचे मांस मक्रु (निषिद्ध) मानले आहे. मांसाहाराला धर्माने परवानगी असली तरी त्यासंबंधी काही नियम आहेत. पशूंमध्ये गवतभक्ष्यी, दुभंगलेले खूर असलेले (म्हणजे घोडा बाद), रवंथ करणारे, वाघ, सिंह, मांजरीप्रमाणे नख नसलेले पशू खाण्याची परवानगी केवळ दिलेली आहे. त्यानुसार गाय, बैल, म्हैस, रेडा, ऊंट, बकरी, मेंढी खाण्यास मान्यता आहे. पक्ष्यांना पंजा असला पाहिजे, पण पंज्यांने भक्ष्य पकडून खाणारे पक्षी निषिद्ध. अंडी देणारे, खवले असलेले मासे खाण्याची मुभा. मिश्या असलेले, कल्ले नसलेले माके निषिद्ध.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .