दिनकर राणे हा त्याचा लंगोटी यार. तो आता हयात नाही. दारू पिऊन लिव्हर फुटून तो मेला. त्या दिनक्याचे दाखले देत नाना बाता मारणाः “अरे दिनक्या राण्याकडे येक बॅटरी होती. बॅटरी म्हंजे सादी-सुदी नाय. लय पावरफुल. पावर म्हंजे किती? अरे सादी-सुदी नाय. अरे ३० हजार फूट बावीत वरसून बॅचरी मारलंस तर तळाक काय आसात ता दिसायचा — ”
मुळात ३० हजार फूट खोलीची विहीर अख्ख्या पंचक्रोशीत असण्याचा संभव नव्हता आणि दिनकर राणेकडे पॉवरफुल बॅटरी कुठची असायला! त्याच्याकडं साधी बॅटरी नव्हती. रात्री हातभट्टी झोकून तो माजाची चुडती पेटवून झेलपटत घरी जायचा. पण दत्तू नानाची बाता मारण्याची पावर ही अशी होती. ३० हजार फुटांवरूनही त्याच्या बातांचा वास यायचा.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
JAYANT PRABHUNE
3 वर्षांपूर्वीmast