थिएटर स्टार्टस विथ टू पर्सन्स - दिलीप कोल्हटकर

पुनश्च    सुभाष सोनवणे    2018-06-04 18:00:22   

काही वेळा दोन घटना एका पाठोपाठ घडतात. त्यात काही कार्यकारणभाव असतोच असं नाही. त्याची संगती लावताना मात्र आपण त्याला योगायोग म्हणतो. बरोबर एक महिन्यापूर्वी, ४ मे २०१८ रोजी जेष्ठ नाट्य दिग्दर्शक आणि कलाकार श्री. दिलीप कोल्हटकर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. आणि त्याच्या पुढच्याच आठवड्यात, आणीबाणी विशेषांकासाठी लेखांच्या शोधात असताना नेमकं आम्हाला दिलीप कोल्हटकरांचीच एक जुनी मुलाखत सापडली. योगायोग अशासाठी की त्याअगोदर अंक चाळताना तो लेख कधी दिसला नव्हता. नोव्हेंबर १९७५ च्या 'माणूस' मासिकातली ही मुलाखत कोल्हटकरांच्या डोळस जाणीवांवर आणि विचार स्पष्टतेवर प्रकाश टाकते. प्रायोगिक रंगभूमी म्हणजे काय? वास्तववादी नाटक असतं का ? कला की व्यवसाय ? सेन्सॉरबोर्ड असावे की नाही ? इत्यादी प्रश्नांचा कोल्हटकरांनी केलेला उहापोह अतिशय वाचनीय आहे. मुख्य म्हणजे १९७५ साली चर्चिले जाणारे विषय तब्बल ४३ वर्षांनी २०१८ सालीही जेव्हा तसेच प्रकट होतात तेव्हा त्या विषयांची कालसुसंगतता जाणवते. आणि म्हणूनच आज दिलीप कोल्हटकरांच्या प्रथम मासिक स्मरणदिनी, सुभाष सोनवणे यांनी घेतलेली ती मुलाखत, अवांतर सदरात प्रसिद्ध करत आहोत. ******** आजच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक मराठी रंगभूमीवर दिलीप कोल्हटकर ह्या नावाला निर्विवादपणे महत्त्वाचे स्थान आहे. व्यावसायिक रंगभूमीबाबत सांगता येत नाही; परंतु हौशी रंगभूमीला मात्र त्याच्यासारख्या सतत धडपड्या कलाकाराची नितांत गरज आहे. किंबहुना मला असे वाटते की हौशी रंगभूमीवरच अशा कलाकारांमधली नवनिर्मितीची प्रेरणा सदैव जागृत राहू शकते. एकदा व्यावसायिक रंगमंचावर गेला की, त्या कलाकाराला-कोणाहीविषयी अनादर न दाखवता स्पष्टच बोलायचं तर पाण्याच्या बैलाचे किंवा पाट्या टाकणाऱ्या मजुराचे स ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


माणूस , सुभाष सोनवणे , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. vasant deshpande

      7 वर्षांपूर्वी

    कोल्हटकर या नावााला मराठी नाट्यव्यवहारामध्ये फार मोठे स्थान आहे. श्रीपाद कृष्ण, चिंतामणराव, चित्तरंजन, बाळ,प्रत्येकाने आपापल्यापरिने मराठी प्रेक्षकाला भऱभरून आनंद दिला आहे. गंमत म्हणजे प्रत्येकाने केवळ नावामुळे नव्हे तर आपल्या चिंतनाने आणि कृतीने आपले स्थान निर्माण केले. दितीप यांनी स्वतःच्या जीवनात प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीचा समन्वय साधायचा यशस्वी प्रयत्न केला. ही मुलाखत त्यामागील त्यांची विचारसरणी स्पष्ट करते. ती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  2. ab

      7 वर्षांपूर्वी

    हे दिलीप कोल्हटकर डोंबिवली स्टेशनपासून आमच्या घरी येण्याच्या रस्त्यावर रहात. त्यांचा बंगला होता आणि आवारात हाफ चड्डीत वावरताना त्यांना बघणे म्हणजे एकदम हॅपनींग होते .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen