मुर्खांची लक्षणे!


समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधात काही मुर्खांची लक्षणे सांगितली होती,

काही सांगायाचे राहुन गेले होते.... 

चालत्या वाहनावरी, 

हेडफोन कानी धरी

गाणी ऐकत जाय घरी, 

तो एक मूर्ख ||

रुग्णालयी वा सभागारी, 

सूचना असली तरी

मोबाईल बंद न करी, 

तो एक मूर्ख ||

कामधंदा कधी ना करी,

अभ्यास, व्यायाम ना करी

रात्रंदिन फोन ज्याचे करी, 

तो एक मूर्ख ||

जिथे तिथे सेल्फी काढतो, 

श्र्लील अश्लील भेद न करतो

आलेला संदेश ढकलतो, 

तो एक मूर्ख ||

घरुन जाता बाजारी, 

कापडी थैली ठेवी घरी

पॉलिथिनची हाव धरी, 

तो एक मूर्ख ||

जाता स्वरुचीभोजनी, 

अन्न घेई भरभरोनी

थोडे खाऊन देई टाकोनी, 

तो एक मूर्ख ||

वाहतूकीचे नियम न पाळणे, 

रस्त्यावरी कचरा टाकणे

ऐसी ज्याची अवलक्षणे, 

तो एक मूर्ख ||

दिली वेळ न पाळतो, 

लोकांचा खोळंबा करतो

खंतखेदही ना मानतो, 

तो एक मूर्ख ||

ऐसी मूर्खलक्षणे असती, 

जी समर्थ समयी नसती

त्यागार्थ यथामती ||

**********

विडंबनकार -सुधीर कुलकर्णी (सौजन्य - https://maitri2012.wordpress.com/page/32/)


विडंबन , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    आपण यातील कोणत्या लक्षणात बसतो हे अजमावून पाहिले

  2. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    उत्तम



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen