वाढदिवसाच्या त-हा

वयम्    कृपा कुलकर्णी    2019-07-06 18:21:33   

वाढदिवस जवळ आला की आपण सगळेच किती उल्हासित होतो नाही? सर्वसाधारणपणे Happy Birthday म्हणणे, केक कापणे, भेटवस्तूंची देवाणघेवाण हा ठरलेला कार्यक्रम आपल्या सर्वांकडे होतो. बाहेरच्या देशात पण असेच असेल का? “माझा या वर्षीचा वाढदिवस परदेशी होणार! व्हिएतनाममधे!!” असे जाहीर करून आरोही तिच्या आई-बाबांबरोबर व्हिएतनामला गेली. परदेशात वाढदिवस होणार म्हणून किती आनंदात होती ती. वाढदिवशी तिला शुभेच्छा देऊन झाल्यावर म्हटलं, whatsApp वर फोटो पाठव तर तिने निराश झाल्याचे, रडवेले इमोजी पाठवले तिने. “कुठला वाढदिवस नि कुठला काय? व्हिएतनाममधे स्वत:चा वाढदिवस असणं ही संकल्पनाच नाही!” “काय?”, आम्हाला सगळयांनाच हा धक्का होता. होय, व्हिएतनाममधे वैयक्तिक वाढदिवस असणं, हे कुणाला ठाऊकच नाही. एका ठराविक दिवशी म्हणजे ‘TET’ या त्यांच्या नववर्षदिनी सगळ्यांचा वाढदिवस साजरा होतो. सगळे व्हिएतनामीज एकमेकांना –chuc ban mot nam moi vuive va sinh nhat-नववर्ष आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात कि झाला वाढदिवस! आमची आरोही तणतणत भारतात परत आली, हे साहजिक होतं. वाढदिवस नाही म्हणजे काय? व्हिएतनामचा सख्खा शेजारी देश म्हणजे चीन. या देशामध्ये वेगळंच चित्र आहे. नुकतं जन्मलेलं बाळ सुद्धा तिथे एक वर्ष वयाचं आहे, असं समजलं जातं. त्यामुळे बाळाचा पहिला वाढदिवस हा चीनमध्ये दुसरा म्हणून साजरा केला जातो. वाढदिवशी बाळासमोर निरनिराळ्या प्रकारच्या अगणित वस्तू पसरून ठेवल्या जातात. ही खूप मजेशीर प्रथा आहे बरं! पुढ्यात पसरलेल्या वस्तूंमधून बाळ ज्या वस्तूला पहिल्यांदा स्पर्श करेल, ते त्याच्या भावी आयुष्यातील कार्यक्षेत्र (career) असेल असं मानलं जातं. म्हणजे बाळाने टेथेस्कोपला ह ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , ज्ञानरंजन , बालसाहित्य

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen