कॉफी हे पेय आज जगात सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याचा शोध लागला तरतरीत बकर्यांमुळे! कसा, ते वाचा!
वाफाळत्या, सुगंधी टेस्टी कॉफीचा आनंद आपण प्रत्येकाने कधी ना कधी घेतला असेल. गरमागरम कॉफी किंवा थंडगार कोल्ड कॉफी प्रवासातला शीण घालवते, मनाला तरतरी आणते. कॉफी पिण्याची पद्धत जगभर सर्वत्र आहे. कॉफीचा इतिहास पार जुना, अगदी दहाव्या-बाराव्या शतकापासूनचा आहे. काय गंमत आहे पाहा! प्रत्येक सहजशोधाचा जनक हा कोणी माणूस असतो. मात्र कॉफी चक्क शेळ्या-मेंढ्यांनी शोधलीये! इतिहासात प्रत्यक्ष कॉफीपानाची नोंद सोळाव्या शतकातली असली तरी तिचा वापर बऱ्याच आधीपासून असावा. कॉफीचे रोपटे हे सगळ्यात आधी इथिओपियात आढळले आणि पहिले कॉफी पेय तयार झाले ते येमेनमध्ये. आफ्रिका आणि अरब जगतात कॉफी लोकप्रिय झाली; मागोमाग ती युरोपमध्ये दाखल झाली. विषुववृत्तीय प्रांत आणि भारतात कॉफीची लागवड जोमाने होते. आता तर जगभरातील जवळपास ७० देशांत कॉफीचे उत्पादन होते. अरेबिक जगतातील 'कहावा' या नावाने प्रसिद्ध असलेली कॉफी फ्रेंचांनी उच्चभ्रूंचे पेय म्हणून नावारूपास आणली. युरोपात ठिकठिकाणी ‘कॉफी हाऊसेस’ तयार झाली. अनेक शास्त्रज्ञ, कलावंतांच्या बौद्धिक गप्पा या कॉफीच्या ग्लासभोवती रंगायला लागल्या. इंग्लंडमध्ये कॉफी हाऊस सुरू झाले, तरी त्यांना आपला चहाच जास्त प्रिय होता. आणि जगभर इंग्रजांचे साम्राज्य पसरलेले असल्याने त्यांनी चहाचा प्रसार जास्तच वेगाने केला. मात्र त्यांना शह दिला तो अमेरिकनांनी! ब्रिटिशांनी अमेरिकेत चहावर अतिरिक्त कर आक ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .