Quora हे ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे व्यासपीठ .. याच Quora विषयी सविस्तर-
तुम्हांला प्रश्न पडतात ना? विचारा की मग! चांद्र नववर्ष म्हणजे काय? भारतीय बनावटीची पहिली स्पोर्ट्स कार कोणती? शिखराची उंची कशी मोजली जाते आणि त्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात?सर्व रंगांमध्ये कोणता रंग सर्वात गडद रंग मानला जातो?, ‘सडासंमार्जन’ या शब्दाचा अर्थ काय? ...असे नानाविध प्रश्न तुम्हांला पडत असतील. काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाठ्यपुस्तकात मिळतात. काही उत्तरं शिक्षक, आई-वडील, वयाने मोठी आणि अनुभवी माणसं देतात. पण आपल्याला पाहिजे त्या वेळेला आजूबाजूला शंकांचं निरसन करणारी मंडळी असतीलच असं नाही. तुमच्या मनात प्रामाणिकपणे आलेला कुठलाही प्रश्न तुम्ही Quora या व्यासपीठावर जाऊन विचारू शकता. Quora हे ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात असणारे प्रश्न तुम्हांला मराठीत विचारता येतात. विशेष म्हणजे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी प्रश्नांची उत्तरं मराठी भाषेतच देतात. एवढचं नव्हे तर, एका प्रश्नाची वेगवेगळ्या पद्धतीने चिकित्सा करून उत्तरं दिली जातात. त्यामुळे तुम्हांला त्या प्रश्नाच्या सर्व बाजू समजून घेण्यास मदत होते. Quora या कंपनीची स्थापना २००९ साली अमेरीकेच्या कॅलिफोर्नियामधील माउंटन व्ह्यू येथे झाली. २०१० साली सर्वप्रथम इंग्रजी भाषेतील व्यासपीठ सुर ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ajitpatankar
6 वर्षांपूर्वीQuora हे शेकडो विषयांबाबत माहिती मिळवण्यासाठी उत्तम व्यासपिठ आहे. मी याचा सदस्य आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे मी दिली आहेत. माझ्या सामान्य ज्ञानात देखील बरीच भर पडली. याचे सदस्यत्व मोफत आहे..