फुजीसान

वयम्    मेधा आलकरी    2019-07-18 10:47:20   

माउंट फुजी जपानमधील ज्वालामुखीचा पर्वत. तो पाहतानाही जपानी लोक प्रेम व शांततेची मागणी करतात. संहार म्हणजे काय याची भीषणता जपानने अनुभवली आहे; त्याची आठवणही त्यांनी जपली आहे.

प्रत्येक देशाची आपली ओळख सांगणाऱ्या खास गोष्टी असतात. जसा आपला ताजमहाल, फ्रान्सचा आयफेल टॉवर आणि अमेरिकेचा स्टॅचू ऑफ लिबर्टी. जपानची ठळक ओळख सांगणाऱ्या माउंट फुजीची प्रतिमा मनात कायमचं घर करून गेली.माउंट फुजीला जपानी भाषेत म्हणतात फुजीसान.  सान म्हणजे पर्वत. 12388 फूट उंच असलेला हा जपानमधील सर्वात उंच पर्वत. बौद्ध अग्नीदेवता फुची ह्यावरून  पर्वताचं नाव पडलं फुजी. आपल्याकडे डोंगराच्या माथ्यावर देवस्थानं असतात, तशीच ह्या पवित्र माउंट फुजीच्या शिखरावर शिन्तो पंथाची देवी सेंगेन-सामाचं  मंदिर आहे. जुलै-ऑगस्ट ह्या दोन महिन्यांत हजारो भक्तगण हा कठीण चढ चढून देवीचं दर्शन घेतात. टुरिस्टसुद्धा मोठ्या संख्येनं ह्या हायकिंगची मजा लुटतात. हा पर्वत रात्रीच्या अंधारात चढून पहाटेचा सूर्योदय पाहण्यासाठी बरेचजण ही खडतर हाईक करतात. The Land of the rising sun.. हे नाव तेव्हा सार्थक होत असेल.  माउंट फुजीला धार्मिक महत्त्व असलं तरी हा सहा लाख वर्षांपूर्वी जन्मलेला ज्वालामुखीचा पर्वत आहे. १७०७ मध्ये त्याचा उद्रेक झाला होता, तेव्हापासून मात्र हा निद्रिस्त आहे. खरंतर माउंट फुजी बघण्याची मला जितकी उत्सुकता होती ना, तितकीच तो बघायला मिळेल ह्याची शाश्वती नव्हती. बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की, तो नेहमी ढगात असतो. त्याचं टोक तर कधीच दिसत नाही. आमची प्रवासदेवता मात्र त्या दिवशी आमच्यावर खूपच प्रसन्न होती. फुजी फाईव्ह लेक एरियातील कावागुचीको ह्या स्टेशनला उतर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ज्ञानरंजन , बालसाहित्य , स्थल विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen