शुभ्र फुलांचा डोलारा- साकुरा!

वयम्    मेधा आलकरी    2019-08-28 18:51:57   

चेरी ब्लॉसम हा जपानमधला निसर्ग-उत्सव. शुभ्र फुलांचा डोलारा घेऊन एकसाथ शिस्तीत बहरलेली झाडं बघणं हा मनोहर अनुभव आहे... मुळात परिसरातल्या सर्वांनी एकत्र बागेत जमून फुलांच्या बहराचा उत्सव साजरा करणं ही कल्पनाच किती सुंदर आहे ना!

जपानमधल्या चेरी ब्लॉसम या उत्सवाचं नाव तुम्ही ऐकलं असेल. एकावेळी चेरीच्या फुलांनी डंवरलेली हजारो झाडं बघणं हा अनुभव खूप रोमांचकारी आहे. हा चेरी ब्लॉसम थोडा लहरी प्रकार असतो. नेमका कधी बहर येईल, सांगता येत नाही. फेब्रुवारीच्या अखेरीस दक्षिणेकडे फुलायला लागलेली ही झाडं, मध्य जपानमध्ये म्हणजे टोकियोत येईपर्यंत एप्रिल उजाडतो आणि उत्तरेकडे तो मेपर्यंत असतो. चेरीच्या फुलांनी डंवरलेल्या एकलकोंड्या झाडाचं रुपडं जितकं मोहक, त्यापेक्षा कितीतरी अधिक सुंदर असतं त्यांचं एकत्रित बहरणं. टोकियोच्या शिंजुकू गोएन पार्कमध्ये मी हा सोहळा पाहिला. भरपूर झाडं डंवरून फुलली होती. ती पाहून मी मोहरून गेले. तिथे एकंदर १५०० चेरीची झाडं आहेत. ही चेरीची झाडं शोभेची असतात, त्यांना खायच्या चेरीचं फळ लागतच नाही. चेरी ब्लॉसमला जपानी भाषेत म्हणतात ‘साकुरा’. हे जपानचं राष्ट्रीय फूल आहे.  जपानमध्ये २०० जातींची चेरीची झाडं आहेत. त्यात सर्वात मनमोहक असतं सोमी योशीनो नावाचं पांढरं फूल. त्याला खूप हलकी अशी गुलाबी छटा असतो. जेमतेम आठवडाभर टिकतो हा बहर. चेरीच्या फुलांचे गुच्छ असतात, शिवाय लोंबणार्या फुलांचीही एक जात आहे. त्यांना ‘विपिंग चेरी’ म्हणतात. आम्ही जपानला गेलो असताना शिंजुकू गोएन पार्कला गेलो. तिथे ओळीत उभी असलेली पांढऱ्या फुलांची झाडं जणू आमची वाट पाहत होती. वरपासून खालपर्यंत शुभ्र पांढरा रंग. खाली पा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव कथन , बालसाहित्य , स्थल विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen