‘पुस्तकांचा सहवास माणसाला सुसंस्कृत व्हायला मदत करतो.’ म्हणूनच वाचनाशी मैत्री करायलाच हवी.
वयम् दोस्तांनो, सांगली-कोल्हापूर भागातील पुरामुळे जे अतोनात नुकसान झाले, त्यात काही पुस्तकेही पाण्याखाली गेली. सांगली येथील नगर वाचनालयाचे नुकसान झाल्याची दु:खद बातमी वाचली. त्या वाचनालयाला पुस्तकांचे वैभव परत मिळावे, म्हणून मराठी प्रकाशक परिषदेने सक्रिय पुढाकार घेतल्याचे समजले. या बातम्या वाचताना डोळ्यांसमोर तरळली ठिकठिकाणी पाहिलेली वाचनालये. काही वाचनालये मनात कायमची घर करून बसली आहेत- वेंगुर्ल्याच्या नगर वाचनालयाची भव्यता भावली होती. सोलापूरच्या हिराचंद नेमचंद वाचनालयातील मुलांचा विभाग इतका आकर्षक होता की, तेथे एकदा आलेले मूल परत परत येत राहील. बदलापूरच्या श्याम जोशी यांची लायब्ररी म्हणजे तर अलिबाबाची गुहाच! तेथे कित्येक दुर्मीळ पुस्तके आहेत आणि ती सहज सापडतात. जोशीकाका स्वत: प्रेमाने काढून देतात. मी जेव्हा जेव्हा परदेशी जाते, तेव्हा तेथील लायब्ररीला आवर्जून भेट देते. अलीकडे ‘स्वीडन’ या युरोपीय देशात गेले असताना तेथील वाचनालयाला भेट दिली आणि त्याच्या प्रेमात पडले. इतके की, १५ दिवसांचा दौरा संपवून परत येताना जसे आपण तेथील मित्रांना, आवडलेल्या झाडा-फुलांना ‘बाय बाय’ करतो ना, तशी मी त्या लायब्ररीला ‘गुडबाय’ करून आले. तिचे काही फोटो काढून माझ्यापाशी ठेवले. त्या लायब्ररीचे डिझाइन इतके लडिवाळ होते की, तेथे नियमित जाण्याचा लळा लागलाच पाहिजे. प्रवेशदारापाशी मेपलच्या कृत्रिम पानांची कमान व रंगीत फुलांच्या वेली जणू ‘या, स्वागत आहे’ म्हणत होत्या. वाचनालयात प्रत्येक विभागाला वेगवेगळी रंगसंगती! त्या संगतीनुसार ते ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शिक्षण
, अनुभव कथन
, पालकत्व
, बालसाहित्य
, व्यक्तिमत्व विकास