एकदंत


गणपती 'गजानन' कसा झाला? हे तुम्हांला माहीत आहेच. पण तो 'एकदंत 'कसा झाला त्याची ही गोष्ट-

गणपतीची मूर्ती तुम्ही नीट पाहिली असेल, तर दोन गोष्टी तुमच्या लक्षात येतील. एक म्हणजे, गणपतीचा एक दात मोडला आहे. आणि दुसरी म्हणजे तोच तुटलेला दात त्याने शस्त्र म्हणून हाती धरला आहे. तर त्याचं झालं असं... रुद्रकेतू आणि शारदा या वेदशास्त्रसंपन्न जोडप्याला जुळे मुलगे झाले. देवांतक आणि नरांतक अशी त्यांची नावे ठेवली. या मुलांकडे बुद्धी तर होतीच, पण नारदमुनींच्या मार्गदर्शनामुळे ते शंकराची आराधना करू लागले. अरण्यात जाऊन पायाच्या एका अंगठ्यावर उभे राहून त्यांनी जप केला. त्यांची ही घोर तपश्चर्या पाहून शंकर प्रसन्न झाले. तेव्हा वर मागताना या दोघांनी "आम्हांला मानव, प्राणी, सर्प कोणाहीकडून शस्त्र किंवा अस्त्राने, दिवसा किंवा रात्री मृत्यू येऊ नये. आम्हांला त्रैलोक्याचे राज्य मिळून तुझी भक्ती करण्याची बुद्धी दे." असे वरदान मागितले. भोळ्या शंकराने लगेचच 'तथास्तु' म्हटले.  या वरदानामुळे दोघे त्रैलोक्य जिंकायला बाहेर पडले. वर मिळाल्याने ते खूपच उद्दाम झाले होते. त्यांनी इंद्रलोकाची मोडतोड केली. इंद्राचे वज्रास्र तोडले. तिथून ते ब्रह्मलोकी गेले. तिथेही त्यांनी उत्पात केला. ब्रह्मदेवांनी तिथून पळ काढला. पुढे ते विष्णुलोकी गेले. विष्णूही लक्ष्मीसह क्षीरसागरांत लपून बसले. नंतर त्यांनी विनायकावर चाल केली. पण त्याचे मस्तक छाटले तरी शंकराच्या प्रसादामुळे ते प ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कथा , बालसाहित्य

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen