मुलांनी, मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टी

वयम्    कृतिका बुरघाटे    2019-09-04 10:00:00   

तुम्हा मुलांना स्वत:चे अनुभव दुसऱ्यांना  सांगायला फार आवडतात ना? यातील काही अनुभवांची 'गोष्ट' होऊ शकते. एखादी गोष्टीवेल्हाळ शिक्षिका तिच्या विद्यार्थ्यांचे  अनुभव ऐकून, गोष्ट कशी रचायची ते त्यांना शिकवते, तेव्हा ती मुले कशा गोष्टी लिहू शकतात ते वाचा...  ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनानिमित्त या वेगळ्या प्रयोगाची गोष्ट-

तुम्ही मुलांनी व्यक्त होणं मला गरजेचं वाटतं. आपल्या मनात काय चाललंय हे जोवर बाहेर पडणार नाही, तोवर मन आतल्या आत तडफडत राहतं. व्यक्त होत राहिलेलं मन मोकळं असतं. ते इतरांना स्वीकारतं, इतरांमध्ये मिसळतं. मन मोकळं करीत असलेल्या मुलांमध्ये नेतृत्वाचे गुण बऱ्यापैकी निर्माण होतात. कुणाबद्दल आपल्याला ओढ वाटते, कधी राग वाटतो, कधी आकर्षण वाटते, केव्हातरी चीड येते, मत्सर वाटतो.. या भावना व्यक्त झाल्याने स्वभाव कोणत्या दिशेला वळत आहे याची जाणीव होते, त्यावर उपायदेखील करता येतो. मुलं शिक्षकांना आपले अनुभव सांगत असतात. हे अनुभव कागदावर उतरले तर? मुलांना लेखनाची संधी दिली तर बरेच काही ते लिहू शकतात. भले मग त्यात शुद्धलेखनाच्या चुका असतील, व्याकरणाच्या चुका असतील, भाषा ही प्रमाणभाषा नसेल, पण त्यात अनुभव असतो, त्यात कल्पना असतात, त्यात विचार असतात. खरं तर मी इंग्रजी भाषा या विषयाची शिक्षिका आहे, पण मुलांमध्ये अभिव्यक्ती-क्षमता निर्माण करायची असेल, तर त्याला भाषा ही मर्यादा नसते. माझ्याकडे देखील अनुभव आहेत, मी पण लिहू शकतो, मला देखील चांगल्या वाईट गोष्टी समजतात, माझ्या मनातही बऱ्याच वेळा चांगले वाईट विचार आले आहेत, जे सगळं मला सांगता येईल, लिहिता येईल ही भावना मुलांमध्ये निर्माण करण्याचा माझा एक छोटास ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , भाषा , बालसाहित्य

प्रतिक्रिया

  1. ajitpatankar

      2 वर्षांपूर्वी

    वा.. छान उपक्रम. आणि दोन्ही गोष्टी मस्त.. आवडल्या..वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen