मशरूम साम्राज्य!

वयम्    मकरंद जोशी    2019-09-08 11:00:42   

गरमागरम मशरूम सूपचे घुटके घेताना किंवा मशरूमचे चटपटीत पदार्थ खाताना तुम्ही निसर्गातील एका मोठ्या ‘फंगी किंगडम’चा हिस्सा असलेल्या अनोख्या गोष्टीचा आनंद घेताय हे समजून घ्या-

असं समजा की तुम्ही ‘कौन बनेगा करोडपती?’च्या हॉटसीटवर बसला आहात आणि दहा लाखांसाठी प्रश्न विचारण्यात आलाय की, ‘असं काय आहे जे वनस्पती नाही, पण शाकाहारी आहारात समाविष्ट केलं जातं?’ जरा गुगली प्रश्न आहे ना? या प्रश्नाचं उत्तर आहे- अळंबी म्हणजे मशरूम्स. पावसाळ्यामध्ये अचानक एखाद्या लाकडाच्या ओंडक्यावर किंवा रस्त्याच्या कडेला जमिनीतून वर आलेल्या पाहायला मिळतात. जगभरात युरोपपासून ते जपानपर्यंत वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीत स्वतःची जागा निर्माण करणाऱ्या मशरूम्स जर वनस्पती नाहीत तर मग काय आहेत? फक्त पावसाळ्यातच दिसतात का? त्यांचेही प्रकार असतात का? ...अळंब्यांच्या अद्भूत विश्वात जरा डोकावूया. अळंबी/ मशरूम्स या वनस्पतींच्या गटात, वर्गात बसत नाहीत. वनस्पतींमध्ये क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य असते, ज्याच्यामुळे त्या सूर्यकिरणांच्या मदतीने स्वतःचे अन्न तयार करून, वाढू शकतात. अळंब्यांमध्ये हे हरितद्रव्य नसते. कारण अळंबी काही वनस्पतींसारखी स्वतंत्र जिवंत गोष्ट नाही. प्राणी आणि वनस्पतींपेक्षा वेगळी रचना, वैशिष्ट्ये असल्याने बुरशीचा जीवसृष्टीत स्वतंत्र विभाग ‘फंगी किंगडम’ मानला जातो. फंगीदेखील प्राण्यांप्रमाणेच स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. तसेच त्या वनस्पतींप्रमाणे प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. अन्न मिळवण्यासाठी फंगी भोवतालच्या वातावरणात काही पाचक द्रव्ये सोडतात आणि त्याद्वारे आवश्यक ती ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ज्ञानरंजन , बालसाहित्य

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen