पावसाच्या तडाख्याने अनेक शहरांना पुराने घेरलं. बदलापूर, मागोमाग कोल्हापूर, सांगली इथल्या लोकांचे प्रचंड हाल झाले. ही परिस्थिती अनुभवल्यानंतर केलेलं हे वृत्तांकन-
२६ जुलैला वेधशाळेने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. अपेक्षेप्रमाणे आभाळ दाटून आलं. काळेसावळे ढग दाटी करून उभे होते. गार वारा वाहत होता. पाऊस पडायला लागला. बघताबघता मुसळधार बरसू लागला. मग कोसळायलाच लागला. आधी छान वाटणाऱ्या पावसाची आता भीतीच वाटायला लागली. आकाशात तांडव नृत्य चाललं होतं. रात्री तर विजांचा कडकडाट होऊ लागला होता. रात्रभर पाऊस सुरू होता. एवढा पाऊस होता की, मला रात्री अडीचपर्यंत झोपच आली नाही. पाण्याने उल्हास नदीची पातळी ओलांडली आणि हळूहळू पाणी गावात शिरायला लागलं. सकाळी जाग आली तीच हेलिकॉप्टरच्या आवाजाने. वांगणीमध्ये अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या रेस्क्यू टीमचं ते हेलिकॉप्टर होतं. तो आवाज ऐकला आणि परिस्थिती गंभीर असल्याचं जाणवलं. लोकलगाड्या बंद होत्या. माझ्या, आईच्या whatsapp वर हळूहळू बरेच फोटो यायला लागले. बदलापूर पश्चिमेला उल्हास नदी वाहते. तिचं पाणी गावात आलं. ते पाणी साचून राहिलं. पाण्याची पातळी काही ठिकाणी तर ६ ते ८ फूट एवढी होती! सगळ्यांचा भीतीने थरकाप उडाला. काहींनी तळमजल्यावरची घरं सोडून सगळं सामान पहिल्या मजल्यावर हलवलं. पश्चिमेच्या बाजारपेठेत पाणी शिरलं. दुकानं, घरं, दवाखाने, सगळ्याचंच नुकसान झालं. टीव्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी बदलापूरमध्ये येऊन पोहोचले. त्यांचं रिपोर्टिंग सुरू झालं. प्रशासनाचे प्रतिनिधी आणि स्वयंसेवकांनी मदतकार्य सुरू केलं. पावसाने थैमान घातलं हो ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .