काही मुलांच्या मनात भूतदया (प्राणिप्रेम) काठोकाठ भरलेले असते, स्वत:च्या तोंडातला घास मुक्या प्राण्याला देण्याइतके!...वाचा ही गोष्ट!!
त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. जोराचा वाराही सुटला होता. झाडं वेडीवाकडी हलत होती. मधूनमधून चकमकाटात विजा कडाडत होत्या. जिकडेतिकडे पाणीच पाणी झालं होतं. सगळे लोक दारं बंद करून आपापल्या घरात बसले होते. अशा वेळी मांजराचं एक चिमुकलं पिल्लू त्याच्या आईला शोधत म्यांव म्यांव करत इकडेतिकडे फिरत होतं. भिजून चिंब झालं होतं बिचारं. बराच वेळ झाला, त्याला काही त्याची आई सापडली नाही. आता तर ते थंडीने कुडकुडू लागलं. त्याच्या तोंडून म्यांव म्यांव पण नीट फुटेना. आस-याकरता ते इकडेतिकडे पाहायला लागलं. समोरच एक बंगला होता. ते बंद फाटकाखालून आत शिरलं. बंगल्याच्या पाय-यांपर्यंत आलं आणि कशाबशा त्या मोठाल्या पाय-या चढून व्हरांड्यात आलं. तिथे कोरडं होतं सगळं. त्याला जरा बरं वाटलं. त्याने अंग घुसळून पाणी झटकलं. आता जरा पुढे होऊन भिंतीपाशी बसणार एवढ्यात एक जाड बुटाचा पाय त्याला दिसला. पिल्लाने हळूच डोळे बारीक करून वर बघितलं. बापरे! केवढा मोठा हा माणूस! अंगात खाकी कपडे, पायात जाड बूट, हातात मोठा दंडा. पिल्लू घाबरलं. तरीही त्याने धीर करून म्यांव म्यांव केलं आणि त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहू लागलं. जणू ते म्हणत होतं, “दादा, दादा, मला थोडा वेळ इथे कोरड्या जागेत बसू दे ना!” पण दादा कसला तो, त्याने दंडा उगारला. हाट् हाट् करत तो पिल्लाच्या दिशेने धावला. पिल्लू पळालं उड्या मारत, पडत पाय-यांवरून परत पावसात गेलं. फाटकाच्या दिशेने जाऊ लागलं. त्याच्या मनात विचार आला, ‘एवढा मोठा व्हरांडा. मी ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .