आतला आवाज !


जो आनंद मी शोधत होतो तो मला त्या दिवशी सापडला! त्या दिवशी मला कळलं की, माझा आनंद ज्या गोष्टीत आहे ती गोष्ट म्हणजे अभिनय!

नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो, मी अमेय वाघ- तुमचा लाडका कैवल्य किंवा फास्टर फेणे. आज मी तुमच्याशी या पत्रातून गप्पा मारणार आहे. मला लहान मुलं आणि त्यांचे पालक नेहमी विचारतात की, तू नाटकात कसा आलास ते सांग. सांगतो- लहानपणापासूनच मी बालनाट्यात काम करायचो. छोट्या-मोठ्या भूमिका करायला मी नेहमी पुढे असायचो. हो, पण अभ्यास आणि शाळा सांभाळून बरं का! एकदा झालं असं की, प्रेक्षक या नात्याने मी एक बालनाट्य बघायला गेलो होतो.  मी ज्या संस्थेच्या माध्यमातून बालनाट्यात कामं करायचो, त्याच संस्थेचं ते नाटक होतं.  त्या दिवशी झालं असं की, त्या नाटकात जो मुलगा सगळ्यात मोठी भूमिका साकारत होता, तोच गैरहजर! तो मुलगा नेमका ऐनवेळी काहीतरी कारणाने येऊ शकला नव्हता. नाटकाचा प्रयोग अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपला होता आणि शेवटच्या क्षणी हा मोठाच प्रॉब्लेम उभा राहिला. बाहेर प्रेक्षक जमू लागले होते आणि आतमध्ये हा प्रॉब्लेम झालेला. पण ‘शो मस्ट गो ऑन’ हे तर रंगभूमीचं पहिलं तत्त्व आहे. त्या न्यायाने आमचे सर थेट माझ्याकडे बघून म्हणाले, “अमेय, तू उभा राहा. ती भूमिका आज तू कर.” मी उडालोच.  काहीतरीच काय?  मी तर ते नाटक पाहिलेलंसुद्धा नव्हतं. धीर करून मी  त्यांना म्हणालो, “कसं शक्य आहे सर, मी तर याआधी नाटक बघितलंसुद्धा नाहीये.” सरांनी मला जवळ बोलावलं आणि मला त्या नाटकाची सगळी कथा सांगितली. म्हणाले, “तुला गोष्ट सांगितली आहे, तुला ती कळलीही आहे. आता या गोष्टीचं अभिनयात रूपांतर  तुला जसं जमेल तसं तू स्टेजवर कर.” मला घाम फु ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


बालसाहित्य , करिअर

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen