चांद्रयान-२ चंद्रावर उतरताना आलेल्या अपयशाने नाउमेद का व्हायचं नाही, या मोहिमेचं यश कशात आहे, हे जरा समजून घेऊया.
चांद्रयान-२च्या संदर्भात या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊया- · २२ जुलै २०१९ या दिवशी चांद्रयान-२नं आकाशात झेप घेतली. तिथपासून ते चंद्रापासून १०० किमी अंतरावर पोचण्यासाठी त्यानं अवकाशातील जवळपास चार लाख किमीचा प्रवास यशस्वीपणं केला. · या मोहिमेनं संपूर्ण देशभरातल्या नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली. ज्यांचा अवकाशविज्ञानाशी संबंध नाही केवळ असेच लोक नाहीत तर ज्यांचा एकंदरच विज्ञानाशी संबंध नाही, अशा लोकांमध्येसुद्धा या मोहिमेनं कुतूहल जागं केलं. त्यांच्यामध्ये सजगता निर्माण केली. विज्ञानाबद्दलची जाणीवजागृती हे या मोहिमेचं सर्वांत मोठं यश आहे. · चंद्राभोवती फिरत राहणारा ऑर्बिटर (भ्रमणयान), त्याच्या पोटात असणारा विक्रम हा लँडर (अवतरणयान) आणि त्याच्या पोटात असणारा प्रज्ञान हा रोव्हर (संचारयान) हे पृथ्वीपासून निघून चंद्राभोवतीच्या १०० किमीच्या कक्षेत पोचेपर्यंतच नाही, तर त्यानंतर भ्रमणयानाच्या पोटातून विक्रम हे अवतरणयान यशस्वीपणं बाहेर पडून त्याचा चंद्रापासून ३३५ मीटर अंतरावर पोचेपर्यंतचा प्रवास बिनचूक झाला. · भ्रमणयान चंद्राच्या भोवती फिरत राहणार आहे आणि त्याच्यामध्ये असणारी विविध उपकरणं, चंद्राचे नकाशे, त्याच्यावरील खनिजं, पाणी आदी गोष्टींचा शोध घेत राहणार आहे. ती माहिती आपल्याला पाठवत राहणार आहे. या चार गोष्टी आपल्याला सांगतात की चांद्रयान-२ मोहिमेनं मोठंच यश आपल्या पदरात टाकलं आहे. विक्रम हे अवतरणयान (लँडर) त्याच्या पोटातल्या ‘प्रज्ञान’ या संचारयानासह (रोव्हर) चंद्राच्या दक्षिण ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .