वाजणारी थंडी आणि आल्याचा चहा


अकबर, बिरबलाची ही एकदम नवीन, आधुनिक आणि स्मार्ट गोष्ट!

बादशहा अकबर काहीतरी कारण काढून बिरबलाला अडचणीत आणण्याचा सतत प्रयत्न करत असे, परंतु बिरबल त्याच्या कात्रीत कधीच सापडत नसे. बिरबलासारखा हुषार मंत्री आपल्या नवरत्न मंत्रिमडळात असल्याचा बादशाला एकीकडे अभिमान वाटत असे, तर त्याचवेळी कधीतरी आपण बिरबलाला युक्तिवादात हरवू किंवा त्याच्या बुद्धीला पेलणार नाही असे कोडे त्याला घालू, असं स्वप्नही बादशहा पाहात असे. बादशहा अकबर स्वभावाने दयाळू असला तरी तो अखेर बादशहाच! कधी कोणाला काय विचारेल याचा भरवसा नसे. बादशहाच्या प्रश्नामुळे अडचणीत आलेली माणसे मग सल्ला घेण्यास बिरबलाकडे जात असत. बादशहाचा लहरीपणा आणि स्वभाव चांगलाच माहिती असल्याने बिरबलही त्या प्रश्नांची अचूक उत्तरे सांगत असे. दिलेले उत्तर समोरच्या व्यक्तीने दिलेले नसून ही बुद्धी बिरबलाची आहे हे माहिती असूनही बादशहा गप्प राहात असे. कधी ना कधी आपण बिरबलाच्या बुद्धीवरही मात करू शकू असा त्याला विश्वास होता. तशा संधीच्या तो नेहमी शोधात असे. दिवाळीचा सुमार होता. एका संध्याकाळी बादशहा आपले दरबारातले काम संपवून शाही शयनकक्षात आराम करवण्यासाठी गेला तेव्हा त्याची धाकटी बेगम चिंताक्रांत पहुडलेली दिसली. दासीने बादशहाला गार गुलाबपाण्यात भिजवलेलेले रेशमी वस्त्र आणून दिले. त्या वस्त्राने आपला चेहरा पुसता पुसता बादशहाने बेगमला विचारले, ‘बेगमजान, आपल्या मुखचंद्रावर काळजीच्या रेषा उमटलेल्या आहेत. कारण काय बरे?’  बादशहाच्या या प्रश्नावर बेगम म्हणाली, ‘मला एक प्रश्न पडलाय, पण तो तुम्हांला विचारण्यात अर्थ नाही, उद्या बिरबलालाच विचारेन मी.’ बेगमच्या या उत्तरानं बादशहाचा स्वाभिमान दुखावला गेला. आपली प्रिय बेगमस ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कथा , बालसाहित्य

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen