मित्रांनो, पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनाचा आधार असलेल्या वायूला 'प्राणवायू' असं नाव मिळालं, ते १७७७ सालामध्ये. ते नाव दिलं अँटनी लॅव्होयसिअर (Antoine Lavoisier) यांनी. अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वच सजीवांना प्राणवायूची आवश्यकता आहे, ही गोष्ट गेली काही शतकं आपल्याला माहीत होती; मात्र प्राणवायूचं प्रमाण कमी झालं, तर शरीरातल्या पेशी त्याच्याशी कसं जुळवून घेतात, ते आपल्याला माहीत नव्हतं. हे शोधून काढणाऱ्या तीन संशोधकांना यंदाचं ‘शरीरविज्ञानशास्त्र’ किंवा ‘वैद्यकशास्त्रा’तलं नोबेल पारितोषिक मिळालं आहे. ते तिघं म्हणजे विल्यम केलिन ज्युनिअर, सर पीटर रॅक्लीफ आणि ग्रेग सेमेन्झा. (William Kaelin, Sir Peter Ratcliffe, Gregg Semenza) २०१६मध्ये या तिघांना 'लास्कर पारितोषिक’ मिळालं होतं. प्राणवायूचं प्रमाण कमी झालं तर शरीरातल्या पेशी त्याच्याशी कसं जुळवून घेतात, याबाबत ते गेली वीस वर्षं संशोधन करत होते. त्याबद्दल-
शरीरातल्या प्रत्येक पेशीत मायटोकाँड्रिआ (Mitochondria) नावाचा एक लहानगा भाग असतो. हा भाग म्हणजे पेशीचं ऊर्जा तयार करणारं केंद्र असतं. याच केंद्रामुळे अन्नाचं रूपांतर ऊर्जेमध्ये होत असतं. प्राणवायूचा पुरवठा कमी-जास्त व्हायला लागला तर या कामात अडथळा येतो. आता प्राणवायूच्या पुरवठ्याच्या प्रमाणात फरक कधी पडतो? तर ज्यावेळी आपण शारीरिक व्यायाम करत असतो, आपण समुद्रसपाटीपासून उंच प्रदेशात असतो किंवा आपल्याला एखादी जखम होते, तेव्हा. आपल्याला हवा त्या प्रमाणात प्राणवायू मिळत नाही, याची जाणीव होऊन शरीरातल्या यंत्रणेनं तातडीनं पावलं उचलली नाहीत, तर ज्या पेशींना कमी प्राणवायू मिळत आहे, त्या निकामी होऊ शकतात. त्याचा परिणाम एकंदर शरीरावर होऊ शकतो. प्रत् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
patankarsushama
6 वर्षांपूर्वीमाहितीपूर्ण लेख आहे