गुदगुल्यांची गंमत


गुदगुल्या केल्यावर हसू आवरत नाही. लहान मुलाच्या जवळ नुसत्या गुद्गुल्यांसाठी बोट्या नेल्या तरी ते हसते आणि दूर पळते. या गुदगुल्या म्हणजे नक्की काय आणि त्याचं काय भावनिक नातं असतं का? या गुदगुल्या फक्त माणसांनाच होतात का ?

‘कढीचं पाळ फुटलं रे फुटलं,’ म्हटलं की आईचं बोट अंगाला लागायच्या आधीच बाळाला उकळ्या फुटतात. त्याच वेळी बाळ आईचा हात दूर ढकलतं, अंग आखडून घेतं. गुदगुल्या हव्याहव्याशा असल्या तरीही भाव ‘नकोनको’चाच असतो. गुदगुल्या करणार्‍याचा आविर्भाव आक्रमक असतो. पोट, गळा, काखा या संरक्षण नसलेल्या भागांवर केलेला तो हल्ला असतो. गुदगुल्या करणार्‍याशी आईबाळासारखं, भावंडांसारखं जिव्हाळ्याचं, विश्वासाचं नातं असलं तरच ‘खुदुखुदु’चा आनंदोत्सव साजरा होतो, नातं अधिक पक्कं होतं. आत्ममग्न मुलांच्या भावना जाग्या करायला, त्यांच्याशी प्रेमाचं नातं जोडायलाही तसा आनंदोत्सव मदत करतो. गुदगुल्या हा भावनिक नात्याचा, देवाणघेवाणीचा उच्च प्रतीचा आनंद आहे. ती गंमत फक्त माणसांपुरतीच मर्यादित नाही. वानरांनाही गुदगुल्या होतात. घुशींना गुदगुल्या केल्या की, त्या माणसाला ऐकू न येणार्‍या उच्चस्वरात आनंदाने चीत्कारतात. गुदगुल्या केल्यावर तिथल्या मज्जातंतूंतून ती जाणीव मेंदूतल्या भावनाकेंद्रांत आणि संवेदना जाणणार्‍या प्रगत भागांत पोचते. तिथे त्या आक्रमक हल्ल्यामागची गमतीची भावना जाणून मज्जाकेंद्रांतलं आनंदरसायनांचं प्रमाण वाढतं आणि ‘हाःहाःहीःहीः’ची प्रतिक्रिया उगम पावते. आपल्याआपणच जर गुदगुल्या करायचा प्रयत्न केला तर त्या स्पर्शाची आधीपासूनच मेंदूत दवंडी पिटली जाते. लहान मेंदू संवेदनाकेंद्राला सावध करतो. त्यामुळे अनपेक्षित दोस्तहल्ल्याची मजा येत नाही. काही प्रकारच्या म ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ज्ञानरंजन , बालसाहित्य

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen