मकर संक्रांतीच्या दरम्यान आपल्याला बऱ्याच ठिकाणी पतंग उडवताना बरीच मंडळी दिसतात. परंतु पतंग कसा तयार होतो ? हाताने की मशीनने ? पतंगाच्या मोसमाव्यतिरिक्त एरवी हे कलाकार काय करतात?... असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील ना ? त्यासाठी वाचा ही जानेवारी २०१५ च्या 'वयम्'मधील उद्योग भेट- ‘पतंग’ सर्वांनाच आकर्षित करून घेतो. आम्ही परवाच या पतंगाच्या कारखान्याला भेट देऊन आलो. मस्त ना! आमच्यासोबत होती मातोश्री विद्यामंदिर देवनार आणि गांधी बालमंदिर कुर्ला या शाळांची मुलं. ए टू झेड काईटस असं या पतंगाच्या कारखान्याचं नाव होतं. हा कारखाना आणि यांचं दुकान कुर्ला (पूर्व) येथे आहे. घरात आपण पतंग मागितला की आपले आई-बाबा पतंग आणून देतात आपण फक्त आकाशात पतंग उडवतो. परंतु हा पतंग कसा तयार झाला ? याचा वेगळेपणा काय याचा विचार आमच्या मनात आलाही नव्हता. पण ‘वयम्’सोबत पतंग कारखान्याला भेट दिल्यावर एक छोटा पतंग बनवायला किती मेहनत घ्यावी लागते हे आम्हांला कळलं. पतंग कारखाना खूप मोठ्ठा असेल असं आम्हांला वाटलं होतं. परंतु कारखाना असलेली इमारत नव्याने बांधण्यासाठी गेल्याने हा कारखाना दुसऱ्या जागेत तात्पुरता हलवला होता. परंतु ही तात्पुरती घेतलेली जागा मात्र फारच छोटी होती. या छोट्याशा जागेत कारखान्याचे मालक सईद अहमद चाचा आम्हांला घेऊन आले. आम्ही मुलं कशीबशी त्या जागेत मावलो. तिथे तीन काका काम करत होते. एक काका पतंगाच्या मध्ये दोन भाग करणारी कांडी असते त्याला गम लावून चिकटवत होते. तर दुसरे काका वाकलेली कांडी चिकटवत होते. या सर्वांचे हात असे काही पटापट चालत होते की त्यांना बघून आम्ही चकीतच झालो. मिनिटाला चार-चार पतंग तयार करत होते. आमच्याशी बोलयलाही त्यांना वेळ नव्हता. ति ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .